ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#याआठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी

ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)

#याआठवड्यातील ट्रेंडिंग रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-४ जणांसाठी
  1. 2-3उकडलेले बटाटे
  2. 6-7ब्रेडचे स्लाइज
  3. ३०० ग्रॅम तेल
  4. 2 टेबलस्पुनकेचप
  5. 4-5ब्रेडच्या तळलेल्या कडा
  6. 2कोथिंबिरीची फांद्या
  7. 2मिरच्या
  8. 2 टेबलस्पुनकोथिंबिर
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  11. 1 टीस्पूनधनेपावडर
  12. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  13. 1 टीस्पूनकिसलेले आले
  14. 1/2 टीस्पूनओवा
  15. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य प्लेट व बाऊलमध्ये काढुन ठेवा बाऊलमध्ये उकडलेल्या बटाटयाची साल काढुन किसुन घ्या त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबिर, तिखट, आमचुर पावडर, धने पावडर, जिरेपावडर, आल्याचा किस, ओवा, मीठ सर्व टाका

  2. 2

    बाऊलमधील साहित्य हाताने मिक्स करा ब्रेडच्या कडा सुरीने कापुन घ्या

  3. 3

    बटाट्याच्या सारणाचे लहान लांबट गोळे बनवुन ठेवा ब्रेडची स्लाइज पाण्यात बुडवुन लगेच काढुन दोन्ही हाताने दाबुन जास्तीचे पाणी काढुन टाका व त्यात तयार गोळा भरून बंद करा

  4. 4

    अशा प्रकारे सर्व रोल करून १० मिनिटे डिशमध्ये ठेवुन सुकवुन घ्या

  5. 5

    नंतर कढईतील गरम तेलात सोडून सर्व बाजुने गोल्डन होईपर्यत तळुन घ्या

  6. 6

    सर्व ब्रेड रोल तळुन प्लेटमध्ये काढुन ठेवा

  7. 7

    प्लेटमध्ये ब्रेडरोल ठेवुन टोमॅटो केचप च्या डॉट ने तसेच कोथिंबिर व केचप, ब्रेडच्या तळलेल्या कडांना डेकोरेट करून डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes