दूधातल पिठलं (doodhatle pithala recipe in marathi)

#रेसिपीबुक
गावाकडची आठवण दुधातील पिठलं माझ्या आजोळचा एक खास मेनू आहे. आणि आमच्याकडे हा मेनू खास घी खिचडीबरोबर केला जातो. बहुतेक सर्वांच्या मनात असेल कि दुधातला पिठलं कसं पण खूप मस्त लगत करून बघा. मीठ वेळेवर टाकायचं पिठल्या मध्ये जेवताना
दूधातल पिठलं (doodhatle pithala recipe in marathi)
#रेसिपीबुक
गावाकडची आठवण दुधातील पिठलं माझ्या आजोळचा एक खास मेनू आहे. आणि आमच्याकडे हा मेनू खास घी खिचडीबरोबर केला जातो. बहुतेक सर्वांच्या मनात असेल कि दुधातला पिठलं कसं पण खूप मस्त लगत करून बघा. मीठ वेळेवर टाकायचं पिठल्या मध्ये जेवताना
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये तेल घालायचं तेल तापलं की त्यात राई जिरे हळद लाल मिरची घालावी
- 2
नंतर त्यात कांदा परतावा कांदा लालसर होत आला की कोथिंबीर व कसूरी मेथी टाकायची आता दुधात बेसन टाकून मिक्स करून घ्यायचं बेसनात पाणी पण टाकायचं एक वाटी आणि हे सगळं तसं फोडणीला आपण पिढल टाकतो तसंच टाकायचं
- 3
हे पिठलं छान दोन-तीन उकळ्या येऊ द्याच्या हे पिठलं ताट मांडली किच करायला घ्यायचं आणि पिठलं गॅस वरून खाली उतरवून ताटात वाढण्याच्या वेळेस मीठ टाकायचं आणि खायला द्यायचं गरम गरम भाताबरोबर पिठले खूप छान लागतो
Similar Recipes
-
मूंग डाळ पिठलं / बेसन(moog dal pithle recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 2-गावाकडची आठवण -post2आम्ही खान्देशी, आमच्याकडे गहू, बाजरी, डाळी, कांदा, कपाशी, मिरची, केळी हे खूप जास्त प्रमाणात पिकवतात. संद्याकाळी जेवण सहसा खिचडी, बेसन भाकरी, ठेचा भाकरी, झणझणीत मसाल्याची भाजी असच असत. संध्याकाळी नेहमीचा प्रश्न काय जेवण बनवायचं? मग काही सापडलं नाही तर बेसन किंवा खिचडी. मी आज मूंग डाळीचे पिठलं कस बनवता ते सांगते. भाजी नसली कि पचायला हलक असं पिठलं बनवले तर मस्त. Deveshri Bagul -
झणझणीत कट वडा सांबार (kaat wada sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week2गावाकडची आठवण 2सासवड माझं माहेर,आमच्या कडील भाज्या उत्तम चवीच्या. तेव्हा खूप काही हॉटेल्स नव्हते,पण अस्मिता चा वडा पाव, त्यांची भेळ हे पदार्थ खूप famous.पण त्याहून ही आठवण म्हणले कि कॉलेज च्या मैत्रिणी सोबत घालवलेले क्षण, कॉलेज जवळ प्रसन्न मध्ये हा मेनू आमच्या आवडीचा, मग ग्रुप मध्ये कोणाचा बर्थडे असला कि खास या मेनू साठी तिने याचीच पार्टी द्यायची बर का! मस्त गरम गरम वडे, त्या सोबत हा झणझणीत सांबार, न एक पितळेच्या भांड्यात भरून दिलेला कट, न आमचे हसणे खिदळणे, खरंच या थिम मुळे आठवणी जाग्या झाल्या. Varsha Pandit -
-
कुळथाचे पिठलं / पिठी (kulith pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1 #2माझ्यासारख्या कोकणातल्या माणसांचा आवडता पदार्थ. हे पिठलं आणि भात / पोळी असेल तर ताटात दुसरं काही नसलं तरी चालतं. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पिठलं अतिशय चविष्ट लागतं. लॉकडाऊन च्या काळात करायला उत्तम. फक्त लसूण असली की पुरे. Sudha Kunkalienkar -
कुळिथ पिठलं (kulith pithla recipe in marathi)
कुळिथ पिठलं कोकणात घरोघरी बनवले जाते.गावी कोणी पाहूणा अचानक आला की, हमखास पिठलं भाताचा बेत केला जातो.पिठलं भात खाण्याची खरी मजा येते ते ,पावसाळ्यात ...मस्त थंडगार पाऊस आणि गरमागरम पिठलं भात ... अहाहा याची खाण्याची मजाच वेगळी..😊😋😋चला तर पाहूयात झटपट पिठलं भाताची रेसिपी..😊 Deepti Padiyar -
पिठलं भाकरी (pithla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्यशेगाव च्या श्री गजानन महाराजांचा हा आवडता नैवेद्य. बुलढाणा जिल्ह्यात असणारे शेगाव पूर्ण महाराष्ट्रात गजानन महाराजांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे येत असतात.इथे महाराजांना पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा असा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय पिठलं भाकरी हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पदार्थ म्हणावे लागतील एवढे ते घरा घरात बनवले जातात. Shital shete -
नागपूरी गोळा भात (Nagpuri Gola Bhat Recipe In Marathi)
#RRRनवरात्रात माझ्या माहेरी म्हणजे नागपूरला गोळा भात हा आवर्जून बनवला जातो बालाजीचा नवरात्र घरी असल्यामुळे भाजक धान्य फक्त खायचं असतं त्यामुळे माझ्या आईची ही स्पेशल गोळा भात रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
पिठलं (Pithla Recipe In Marathi)
#BPRपिठलं हा महाराष्ट्रातील मुख्य असा जेवणाचा पदार्थ आहे गावाकडील जवळपास सगळ्याच लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे शेतकऱ्याचा तर हा मूळ असा जेवणाचा पदार्थ आहे. पिठलं भाकरी ठेचा हा परफेक्ट असा मेनू आहे.रात्रीच्या जेवणातून पिठलं भाकरी म्हणजे पौष्टिक असा जेवणाचा प्रकार आहे.करायलाही अगदी झटपट असा तयार होतो.बऱ्याच जणांना भाताबरोबर पिठले खूप आवडते माझ्याकडे पिठलं भाकरी आणि ठेचा ठरलेलाच असतो.माझ्या सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पिठलं आणि भाकरी मला खूप आवडतो माझ्या आज्जी मुळे मला या जेवणाची खूप सवय आहे.अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले पिठले रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
स्वीट पापड्या (sweet ppadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 #गावाकडची आठवणआमच्या गावाला अक्षयतृतीयेला पापड्या चा नेवेद्य हा केला जातो. त्याची आठवण म्हणून स्वीट पापड्या. Vrunda Shende -
"खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं" (pithla recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशल" खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं " किंवा "गाठीचं पिठलं" झटपट होणार अस्सल गावरान मेनू, म्हणजे पिठलं...!!पिठलं आणि भाकरी हे म्हणजे अगदी भन्नाट समीकरण...त्यात पिठलं चुलीवरच असलं म्हणजे तर सोने पे सुहागा वाली फीलिंग....!! मी आज मातीच्या भांड्यात पिठलं बनवून थोडा गावरान फील आणायचा प्रयत्न केलाय..☺️☺️ आणि अगदीच मस्त आणि अफलातून बेत झालाय...!!तेव्हा नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
#रेसिपीबुकगावाकडची आठवणमाझ्या माहेरी गणेश चतुर्थीला /गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसादाला हि खिरापत करतात.१० दिवस गोड गोड पदार्थ आणि जाताना गोडा बरोबर तिखट प्रसाद. Suvarna Potdar -
पिठलं (pithla recipe in marathi)
#goldenapron3#week18#besanमाझ्या सगळ्या सुगरण मैत्रिणीनं साठी पिठलं हे खूप सोपा आणि कॉमन असेल पण खर सांगू का आता परियांत घरी कूक यायचे त मी पहिल्यांदा पिठलं try केलं। कूकपॅड मुले खूप काही जमायला लागले। Sarita Harpale -
पिठलं कोथिंबीर वडी (pithla kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1नेहमी पेक्षा थोडी हटके पिठलं कोथिंबीर वडी अगदि कमी वेळात तयार होते आणि तेल पण जास्त जागत नाही थंडी मध्ये अगदी खाण्या साठी मस्त लागते Sushma pedgaonkar -
मेथीचं पिठलं (Methich Pithal Recipe In Marathi)
#NVRथंडीत संध्याकाळी गरम गरम भाकरी बरोबर पिठलं हा बेत मस्तच. पण एकाच प्रकारचे पिठलं खाण्या पेक्षा मेथी घालून केलेलं पिठलं खूप छान लागते.त्यामुळे मेथीची भाजीसुद्धा पौष्टिक आपल्या खाण्यात येते. Shama Mangale -
कुरकुरीत रोटी पात्रा (roti patra recipe in marathi)
#फ्राईडपावसाळी मोसमात सर्व पदार्थ झाले,रोजच काहीतरी चटपटीत कर असा तगादा.रोज मग पोळ्या उरायच्या मग मात्र आता काहीतरी करून हे थांबलेच पाहिजे.झाले आले मनात पण वेळेवर घरी दही होते.एक अतिशय स्वादिष्ट रेसिपी जन्माला आली ,घरी आलेल्या पाहुण्यांना दिली त्यांना कळलेच नाही .पण तारीफ भरपूर झाली व आपल्या सोबत घेऊन गेली.हीच तर खरी पावती . Rohini Deshkar -
भजे ची भाजी (bhaje chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #भजेचीभाजी गावाकडची आठवण Mamta Bhandakkar -
मेंथीआंबा (Methamba Recipe In Marathi)
#MDR#माझ्या आईसाठी खास रेसिपीमदर डे निमित्त आईला आवडणारा मेनू करण्याचा बेत केला आहे 😋😋😋 Madhuri Watekar -
प्रवासी मेनू दुधातील शेंगदाणे पिठले (dudhatil shengdana pithle recipe in marathi)
#दूधहा मेनू खास आमच्याकडे प्रवासात असतो . दुधातीलच - दशम्या , शेंगदाणे पिठले, मिक्स केलेल्या चटण्या , दही, हिरव्या मिरच्या ,लोणचे देखील असते . भारी टेस्टी लागते . करून पहा तर तुम्ही देखील ,.... Mangal Shah -
भाकरी-ठेचा शेंगदाण्याची चटणी व मुगाची पेंडपाला (moong pendpala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 माझ्या गावाकडची आठवण Girija Ashith MP -
बेसन पिठु (besan recipe in marathi)
लहानपणी आमच्या कडे हे नेहमी व्हायचे,माझ्या बाबांना खूप आवडायचं हे पिठलं..मलाही खिचडी सोबत गरम गरम भाता सोबत हे पिठलं खूप आवडते,,,मुलांना नाही आवडत, पण माझ्या एकटीसाठी मी बऱ्याच वेळा करते...छान त्याच्यासोबत कांदाभाकर हिरवी मिरचीचा ठेचा हे असं असलं की छान मजा येते पिठलं खायला... Sonal Isal Kolhe -
भाकरी आणि पिठलं
#lockdown recipeसध्या करोना व्हायरस मुळे आपण सगळेच आपापल्या घरांमधे बंद आहोत आणि ते आपल्या हितासाठीच आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटाला सामोरे जावे लागत असताना, घरातच उपलब्ध असणाऱ्या खाण्याच्या शिल्लक सामानातून सर्वांसाठी पुरेसे पदार्थ बनवणे यासाठी आता गृहिणींचा कसं लागणार आहे. म्हणूनच आपण सर्वजणं आहे त्या परिस्थितीत न डगमगता धीराने सामोरे जाऊया. मी आज घरात शिल्लक असलेल्या नाचणी पीठ आणि तांदूळ पीठ यातील थोडे पीठ घेऊन मिक्स भाकरी बनवली. आणि बेसन पीठापासून पिठलं बवनले. Ujwala Rangnekar -
-
तंबिट लाडू (tambit ladoo recipe in marathi)
#लाडूखास आईची रेसिपीतंबीट लाडू हा कर्नाटक मध्ये नागपंचमीला खास नैवेद्यासाठी केला जातो नागपंचमीला सगळ्या माहेरवाशिणी आपल्या माहेरी येतात झुले बांधतात बांगड्या भरतात भाऊ आणि बहिणीचा सण आहे माझी आई कर्नाटक मध्ये असल्यामुळे तिची ही आज रेसिपी मी तिला माहेरची आठवण करून द्यायला बनवलेली आहे आणि लाडू असल्यामुळे एकदम मस्त रेसिपी आहे Deepali dake Kulkarni -
मेथीचे पिठलं -भाकरी (methichya pithla bhakhri recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मेथीचे पिठलं -भाकरी रेसिपी#पोस्ट 2 Rupali Atre - deshpande -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे.. Varsha Ingole Bele -
खानदेशी उकळिच पिठल (ukadicha pithla recipe in marathi)
#ks4 खानदेश म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार हे तीन जिल्हे आहेत. त्याचिं विविध प्रकारच्या रेसिपी आहे . अशीच एक भन्नाट झटपट रेसिपी केली आहे. Deepali dake Kulkarni -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण पंचामृत हे गावात, शहरात सगळीकडेच सणासुदीला आवर्जून करतात. पण माझ्यासाठी ही गावाकडची आठवण कशी झाली ते मी तुम्हाला सांगते.माझं लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या महिन्यात अक्षयतृतीया आली. तेव्हा हा सण गावाला साजरा केला होता. त्यावेळी माझ्या सासुनी हे पंचामृत केलेलं होतं. हे मी त्यावेळी खाल्लं तेव्हापासूनच मी पंचामृताच्या प्रेमात पडले. त्यावेळी मी गावाला ताटात दोन-तीन वेळा पंचामृत वाढून खाल्ले. माझे गावचे वातावरण व सासुबाई या फ्री च आहेत. त्यामुळे पंचामृत ताटात वाढुन घेताना मला जराही संकोच वाटला नाही. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही त्यामुळे त्या आम्हा सुनानांच मुलीसारखं मानतात. आणि आता जेव्हाही महालक्ष्मीच्या प्रसादाला गौरी-गणपतीला मी हे पंचामृत खाते त्यावेळी नेहमीच मला पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचं पंचामृत खाल्ल्याची आठवण येत असते. तेव्हा आज मी गावाकडची आठवण म्हणून हे पंचामृत घरी केलेले आहे खूप मस्त टेस्टी झालेलं....😋 तेव्हा आंबट गोड तिखट अशा या पंचामृताची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. Shweta Amle -
-
-
कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 2 #गावाकडची आठवण : रेसिपी क्र.२ Kalpana Pawar
More Recipes
टिप्पण्या