मूंग डाळ पिठलं / बेसन(moog dal pithle recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#रेसिपीबुक
#week 2-गावाकडची आठवण -post2
आम्ही खान्देशी, आमच्याकडे गहू, बाजरी, डाळी, कांदा, कपाशी, मिरची, केळी हे खूप जास्त प्रमाणात पिकवतात. संद्याकाळी जेवण सहसा खिचडी, बेसन भाकरी, ठेचा भाकरी, झणझणीत मसाल्याची भाजी असच असत. संध्याकाळी नेहमीचा प्रश्न काय जेवण बनवायचं? मग काही सापडलं नाही तर बेसन किंवा खिचडी. मी आज मूंग डाळीचे पिठलं कस बनवता ते सांगते. भाजी नसली कि पचायला हलक असं पिठलं बनवले तर मस्त.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीमूंग डाळ
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 2-3हिरवी मिरची
  4. 1 टेबलस्पूनहळद, कढीपत्ता, कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनलसूण, तेल, मीठ
  6. 1 टीस्पूनजीर
  7. 1/2 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम मूंग डाळ अर्धा तास भिजत ठेवा. नंतर मिक्सर मध्ये वाटून घ्या. कांदा, लसूण बारीक कापून घ्या.

  2. 2

    कढई मध्ये तेल तापवून त्यात जीर, मिरची, कढीपत्ता, लसूण टाकून परतवा. नंतर कांदा टाका. कांदा थोडा शिजल्यावर हळद, हिंग टाका.

  3. 3

    नंतर त्यात पाणी आणि मीठ टाकून वाटलेली मूंग डाळ, कोथिंबीर टाकून झाकण ठेवून पिठलं शिजू दया. त्याला तेल सुटायला लागलं कि गॅस बंद करून पिठलं भाकरी किंवा चपाती, भात सोबत खायला घ्या.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes