बटाटा वडा (batata wada recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#cooksnap
रोज नाश्ताला काय करायचे. हा खुप मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकलेला असतो.. आणि नाश्ता चटपटीत देखील हवा.. म्हणून मग मी आज Deepa Gad यांची रेसीपी cooksnap करायची ठरवली.. सोप्यात सोपी.. लवकरात लवकर होणारी. चटपटीत.. तेवढीच टेस्टी अशी डीश... बटाटा वडा

बटाटा वडा (batata wada recipe in marathi)

#cooksnap
रोज नाश्ताला काय करायचे. हा खुप मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकलेला असतो.. आणि नाश्ता चटपटीत देखील हवा.. म्हणून मग मी आज Deepa Gad यांची रेसीपी cooksnap करायची ठरवली.. सोप्यात सोपी.. लवकरात लवकर होणारी. चटपटीत.. तेवढीच टेस्टी अशी डीश... बटाटा वडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चार लोकांना साठी
  1. 1/2 किलोआलू
  2. 1/2 टेबलस्पूनप्रत्येकी मोहरी, धणे पावडर, जीरे पावडर, सांभार मसाला, तिखट
  3. 1/2 टीस्पूनहळद, हिंग
  4. तळण्यासाठी तेल
  5. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1/2लिंबू रस
  7. चवीनुसारमीठ
  8. थोडासाकढीपत्ता
  9. 250 ग्राम बेसन
  10. 2कांदे
  11. 7,8हिरव्या मिरच्या
  12. 2 ..3 टेबलस्पून तांदूळ पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम आलू उकडून घ्या. गॅस वर पॅन ठेवून त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करुन..त्यात मोहरी.. बारीक चिरलेला कांदा.. हिरव्या मिरच्या.. कढीपत्ता.. तिखट.. धनेपावडर. जिरापावडर.. हळद.. हिंग.. घालून दोन मिनिटे परतून घ्या. नंतर त्यामध्ये कुस्करून घतलेले आलू घाला.. आता यामध्ये चवीनुसार मीठ.. सांभार मसाला... थोडी कोथिंबीर घालून दोन मिनिटे गॅस वर होऊ देणे. ही झाली आपली बटाट्याची भाजी तयार.

  2. 2

    आता बेसन घेऊन त्यामध्ये हळद.. हिंग.. चवीनुसार मीठ. 1/2 तिखट.. 2..3 टेबलस्पून तांदूळ पीठ.. 1 टेबलस्पून तेलाचे मोहन घालून बॅटर भिजवून घ्या.

  3. 3

    आपण जो आलूच्या भाजीचा मसाला केला आहे.. त्याचे छोटे छोटे गोळे करून.. बेसनच्या बॅटर मधून घोळवून.. ते कडकडीत तेलात तळून घ्यावे. हिरवी मिरची.. टोमॅटो सॉस. सोबत गरमा गरम सर्व्ह करावे... आपले बटाटे वडे... 💕💕💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes