टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#Cooksnap
माजी मैत्रीन "अंजली भाईक" हीची ही" कूक स्नॅप" साठी रेसिपी केली आहे,
अंजु म्हणजे मल्टी टॅलेंटेड, ऑल राऊंडर, काय येत नाही तिला,
ज्ञानाने भरलेला खजिना असे मी म्हणेल,
अशा चांगल्या मैत्रिणी ची रेसिपी मला करायला खूप आवडेल,,,
तशी जी टोमॅटोची चटणी आमच्याकडे सर्वांचे फेवरेट आहे,,

टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)

#Cooksnap
माजी मैत्रीन "अंजली भाईक" हीची ही" कूक स्नॅप" साठी रेसिपी केली आहे,
अंजु म्हणजे मल्टी टॅलेंटेड, ऑल राऊंडर, काय येत नाही तिला,
ज्ञानाने भरलेला खजिना असे मी म्हणेल,
अशा चांगल्या मैत्रिणी ची रेसिपी मला करायला खूप आवडेल,,,
तशी जी टोमॅटोची चटणी आमच्याकडे सर्वांचे फेवरेट आहे,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 9टोमॅटो मोठ्यात साईजचे
  2. 3कांदे मोठ्या साईजचे
  3. 12लसूण पाकळ्या
  4. 1 इंचआलं
  5. 6हिरव्या मिरच्या
  6. 1/3गोडतेल
  7. 1 टेबल्सस्पून लाल तिखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनकाळा मसाला
  10. 1 टी स्पूनधने पावडर
  11. 1 टीस्पूनजिरे
  12. 1/2 टीस्पूनहिंग
  13. 1 टीस्पूनमोहरी
  14. चवीप्रमाणे मीठ
  15. 2 टेबल स्पूनकोथिंबीर
  16. 2 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    सर्वप्रथम सगळे साहित्य एका ट्रेमध्ये काढून ठेवणे, गॅसवर कढईत तेल तापायला ठेवणे,, तेल तापले की मोहरी आणि हिंग घालावे, मोहरी तडतडली की चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालावी,, हे चांगले एक मिनिट परतून घ्यावे

  2. 2

    कांद्याचा कच्चेपणा गेल्या की त्याच्यामध्ये लसन, अद्रक, जिर यांचा ठेचा घालावा, आता हे चांगलं दोन मिनिटं परतून घ्यावं, आता त्यामध्ये सर्व सुखी मसाले घालावे, लाल तिखट, काळा मसाला, हळद, धने पावडर हे घालून चांगले मिक्स करावे, दोन ते तीन मिनिटं चांगलं मंद गॅसवर परतून घ्यावे,

  3. 3

    आता या मसाल्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून द्यावा, आणि मीठ घालून चांगले मिक्स करावं, आता हळूहळू टोमॅटो ला पाणी सुटेल, ते पाणी आटत पर्यंत भाजी आपल्याला शिजवायची आहे,

  4. 4

    भाजीला 7,8 मिनिट शिजू द्यावे, त्यामध्ये आता साखर घालावी, परत दोन मिनिटे शिजवून घ्यावे, तिखट, साखर, मीठ, तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी-जास्त करू शकता,,

  5. 5

    आता भाजी चे पाणी पूर्ण आटलेले आहे, भाजीला तेल पण सुटलेल आहे, आता भाजी झालेली आहे असे समजावे, आता या भाजीवर कोथिंबीर घालावी, आणि पराठा सोबत गरम गरम सर्व करा, छान तिखट आंबट गोड अशी ही भाजी खूप सुंदर असावी लागते,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes