लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

दुधीची भाजी बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्यातलीच ही एक छानशी रेसिपी..

लौकी कोफ्ता करी (lauki kofta curry recipe in marathi)

दुधीची भाजी बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपण करतो, त्यातलीच ही एक छानशी रेसिपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारण २० मिनीटे
२-३
  1. कोफ्तासाठी..
  2. 1/4 कपकिसलेला दुधी
  3. 1 लहानकांदा
  4. 2-3 टेबलस्पूनबेसन...आवश्यकतेनुसार
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  7. 1/4 टीस्पूनधणेपूड
  8. 1/4 टीस्पूनजिरेपूड
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  11. तळण्यासाठी तेल
  12. करी साठी
  13. 1कांदा
  14. 1टोमॅटो
  15. 1/2 टीस्पूनजीरे
  16. चिमूटभरहिंग
  17. 1/2 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  18. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  19. 1/4 टीस्पूनहळद
  20. 1 टीस्पूनधणे जिरेपूड
  21. 1 टीस्पूनगरम मसाला
  22. 1 कपपाणी
  23. 1 टेबलस्पूनतेल
  24. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

साधारण २० मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    किसलेला दुधी पिळून घेतला,कोफ्ता साठी लागणारे बाकीचे साहित्य घेऊन सगळे नीट मिक्स करून त्याचे छोटे गोळे तयार केले. दुधिचे पिळून काढलेले पाणी फेकून न देता करी करताना ग्रेव्ही साठी वापरणार आहे.तसेच ज्या भांड्यात कोफ्ते बनवले त्याठो थोडे पाणी घालून ते पाणी करी करताना त्यात घातले की करी दाटसर होते.

  3. 3

    कोफ्ते तेलात छान लालसर होईपर्यंत तळले.

  4. 4

    करी साठी पॅन मध्ये तेल घालून त्यात जीरे,कांदा आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतले.नंतर टोमॅटो,कोथिंबीर आणि सुके मसाले घालून परतून घेतले.

  5. 5

    त्यात द्दुधी पिळून काढलेले पाणी,भांड्यात काढलेले पाणी आणि १/२ कप गरम पाणी घालून उकळले,त्यात काश्मिरी लाल मिरची पावडर घातली.

  6. 6

    झाकण ठेऊन छान शिजवले.थोडे गार झाले की मिक्सर मधून फिरवून घेतले.परत पॅन मध्ये घालून बाकीचे १/४ कप पाणी घालून उकळले.नंतर त्यात कोफ्ते घालून झाकण ठेऊन पाच मिनिटे वाफ आणली. करी छान कोफ्ता मध्ये शिरून कोफ्ते छान लागतात.

  7. 7

    तयार कोफ्ता करी बाउल मध्ये काढून घेतली.पोळी, पराठा,भात यासोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes