हरियाली नुडल्स सोया बिर्याणी (haryali noodles soya biryani recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#बिर्याणी
खाणाऱ्यांची पट्टराणी, शाकाहारी बिर्याणी प्रथमच बनवली, माझे यजमान नाक मुरडत होते कारण ते पक्के मांसाहारावर ताव मारणारे, पण आज मी त्यांना हि बिर्याणी खातांना बोटं चाटतांना चोरून पाहिलं ...

हरियाली नुडल्स सोया बिर्याणी (haryali noodles soya biryani recipe in marathi)

#बिर्याणी
खाणाऱ्यांची पट्टराणी, शाकाहारी बिर्याणी प्रथमच बनवली, माझे यजमान नाक मुरडत होते कारण ते पक्के मांसाहारावर ताव मारणारे, पण आज मी त्यांना हि बिर्याणी खातांना बोटं चाटतांना चोरून पाहिलं ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपजूने बासमती तांदूळ
  2. 1 कपगरम पाण्यात मीठ टाकून भिजवलेले सोया चंक्स
  3. 1 कपउकडलेले पाणी निथळलेले नूडल्स
  4. 1मोठा कांदा बारीक लांब कापून एक तास सुकवलेला
  5. 100 ग्रॅमपालक
  6. 1शिमला मिरची लांब काप केलेली
  7. 8 /10 हिरव्या मिरच्या
  8. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  9. 1/2लिंबाचा रस
  10. 1 कपदही
  11. 1 कपसाजूक तूप
  12. कांदा तळण्यासाठी तेल
  13. 1तेजपान
  14. 1 टीस्पूनजिरे
  15. 1 टीस्पून धणेपूड
  16. 4-5 मिरे
  17. 1मोठी विलायची
  18. 2 ते 3 लवंगा
  19. 1छोटी विलायची
  20. 1 थेंबकेवडा इसेन्स
  21. 1 पिंचखाण्याचा हिरवा रंग
  22. 1 1/2 टिस्पून मीठ
  23. 1 टीस्पूनकसूरी मेथी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    वर दर्शवलेले साहित्य तयार ठेवून सर्वप्रथम एका पॅनमध्ये गरम पाणी घेऊन तांदूळ शिजवायला ठेवावे,त्यामध्ये वर दर्शवलेला खडा मसाला व कसुरी मेथी घालावी व तांदूळ 80% शिजल्यावर एका चाळणी मध्ये ते काढून घ्यावे म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाईल.

  2. 2

    आता मिक्सर मध्ये पालक कोथिंबीर व पाच-सहा हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस घालून पेस्ट करून घ्यावी, पॅनमध्ये थोडे तूप घेऊन भिजवलेले सोया चंक्स हाताने पिळून परतून घ्यावे,त्यामध्ये एक चमचा ही पेस्ट मिक्स करून पुन्हा थोडे परतून बाजूला ठेवावे,अशीच क्रिया नूडल्स साठी सुद्धा करावी. दुसरीकडे कढईमध्ये तेल घेऊन कांदा तळून घ्यावा.ह्या तळलेल्या कांद्याला बिर्यान असे म्‍हणतात.

  3. 3

    कांदा तळल्यावर बिर्यान फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे दिसतो. आता पॅन मध्ये थोडे तूप घेऊन जिऱ्याची फोडणी घेऊन सिमला मिरची,उरलेल्या हिरव्या मिरचीचे काप परतावे.त्यामध्ये धणेपूड व मीठ घालावे.

  4. 4

    सिमला मिरची तेलात झाल्यावर त्यामध्ये पालकाची पेस्ट घालावी,थोडी परतल्यावर त्यामध्ये दही ॲड करावे व छान परतावे थोड्यावेळाने कडांना तूप सुटेल तेव्हा यातील अर्धे मिश्रण बाहेर काढून ठेवावे.

  5. 5

    पॅन मध्ये असलेले अर्धे मिश्रण पॅन भर पसरवावे व त्यावर एक थर सोया चंक्स नंतर नूडल्स मग बिर्यान व त्यावर शिजवलेला मोकळा भात. पुन्हा पालकाचे मिश्रण पसरवून वरील क्रिया पुन्हा करावी.आता या थरावर थोडे बिर्यान घालून कडेला उरलेले तूप सोडून काही तूप थरावर सुद्धा सोडून, केवडा ईसेंस चा एक थेंब सोडून व नखभर हिरवा रंग थोडा पसरवून एक दणदणीत वाफे साठी झाकण ठेवावे व जरा वेळ मंद गॅसवर होऊ द्यावे

  6. 6

    थोड्या वेळाने गॅस बंद करावा.आपली हरियाली बिर्याणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (2)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
आम्ही बरिस्ता म्हणतो कांद्याला

Similar Recipes