शेहरजादे इराणी फिश बिर्याणी (fish biryani recipe in marathi)

Dipti Warange
Dipti Warange @cook_20705185
कल्याण, मुंबई

#बिर्याणी बिर्याणी चे मूळ असे म्हणतात पर्शियन.. म्हणजे आताचे इराण. बिर्याणी पुढे मोघल शाही भटारखान्यात अजून रंजक बनविण्यात आली व तीला भारतातही आणली मोघलांनीच. आज बनवलेल्या बिर्याणी चे नाव एका पर्शियन राणी च्या नावा नंतर ठेवण्यात आले आहे... शेहरजादे....ही राणी म्हणतात खूप छान अरबी कथा सांगायची. इराण मधे शाहीजीरे, केशर, किसमिस हे प्रामुख्याने वापरले जाणारे घटक... आपण हि आपल्या रेसिपीला त्याचाच टच देण्याचा प्रयत्न केला आहे....

शेहरजादे इराणी फिश बिर्याणी (fish biryani recipe in marathi)

#बिर्याणी बिर्याणी चे मूळ असे म्हणतात पर्शियन.. म्हणजे आताचे इराण. बिर्याणी पुढे मोघल शाही भटारखान्यात अजून रंजक बनविण्यात आली व तीला भारतातही आणली मोघलांनीच. आज बनवलेल्या बिर्याणी चे नाव एका पर्शियन राणी च्या नावा नंतर ठेवण्यात आले आहे... शेहरजादे....ही राणी म्हणतात खूप छान अरबी कथा सांगायची. इराण मधे शाहीजीरे, केशर, किसमिस हे प्रामुख्याने वापरले जाणारे घटक... आपण हि आपल्या रेसिपीला त्याचाच टच देण्याचा प्रयत्न केला आहे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. फिश मॅरीनेड साठी
  2. 400 ग्रॅमबोनलेस सुरमई चे 2 इंचाचे तुकडे
  3. 1 नगअंड
  4. 1/4 टीस्पूनकाळीमीरी पूड
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  10. 1 टीस्पूनआले पेस्ट
  11. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला पुदिना
  12. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोर
  13. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  14. तळण्यासाठी तेल
  15. भाताच्या पाणी (फिश स्टॉक) साठी :
  16. 4 कपफिश स्टॉक
  17. 3लवंग
  18. 1बडी वेलची
  19. 2हिरवी वेलची
  20. 2 इंचदालचिनी तुकडा
  21. 5अख्खी काळीमीरी
  22. 1जायपत्री
  23. 1/2 टीस्पूनशाह जीरे
  24. 1/4 टीस्पूनबडीशेप
  25. 1 टीस्पूनअख्खे धणे
  26. बिर्याणी भाता साठी :
  27. 400 ग्रॅमबासमती तांदूळ
  28. 1/4 कपतूप
  29. 1 टीस्पूनलिंबू रस
  30. 2सुक्या लाल मिरच्या
  31. 2तमालपत्र
  32. 1मोठा कांदा
  33. 1मोठा टोमॅॅटो
  34. 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  35. 1 टीस्पूनबारीक लांब आल्याचे काप
  36. 1 टीस्पूनमीठ
  37. फिश ग्रेव्ही साठी :
  38. 1/4 कपतेल
  39. 2मोठे कांदे
  40. 1मोठा टोमॅटो
  41. 1/2 कपदही
  42. 1 टेबलस्पूनलसूण पेस्ट
  43. 1 टीस्पूनआले पेस्ट
  44. 1हिरवी भोपळी मिरची
  45. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  46. 1/2 टीस्पूनहळद
  47. 1 टीस्पूनगरम मसाला
  48. चवीनुसारमीठ
  49. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  50. 1/2 कपपाणी
  51. लेयरींग साठी :
  52. 1/2 कपतळलेला कांदा
  53. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  54. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला पुदिना
  55. 2 टेबलस्पूनकेशर घातलेलं पाणी
  56. 1 थेंबकेवरा इसेंस

कुकिंग सूचना

90 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून 40 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. एकी कडे 2 कांदे बारीक लांब कापून तेलात खरपूस गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे

  2. 2

    फिश मधले 2 तुकडे बाजूला ठेवून उर्वरित फिश ला मॅरीनेड साठी कॉर्नफ्लोर व तळण्यासाठी तेल सोडून दिलेले सर्व साहित्य लावून 30 मिनिटे मॅरीनेड करण्यासाठी ठेवावे.

  3. 3

    एक पातेल्यात 4 कप पाणी घेऊन त्यात बाजूला ठेवलेले फिश चे तुकडे घालून 25 मिनिटे छान उकळावे, पाणी 3 कप झाले पाहिजे. नंतर भाताच्या पाण्यासाठी मधे दिलेले सर्व खडे मसाले एका स्वच्छ कपड्याच्या पोटलीत बांधून ह्या पाण्यात सोडून 10 मिनिटे आणखी उकळावे व नंतर पोटली काढून घ्यावी. एकीकडे दुसर्‍या पातेल्यात पाणी ठेवून उकळी आल्यावर त्यात 4 टोमॅटो सोडावे व 3 मिनिटांनी गॅस बंद करावा. ठंड झाल्यावर हे टोमॅटो सोलून घ्यावे व त्याची बारीक प्युरी करावी.

  4. 4

    आता बिर्याणी भात बनविण्यास घ्यावे. एका पातेल्यात तूप घालून त्यात लाल मिरची व तमालपत्र घालावे. नंतर बारीक चिरलेला कांदा, आले लसुण पेस्ट घालून अगदी नरम होईपर्यंत परतावे. मग 1/2 कप टोमॅटो प्युरी घालून छान एकजीव करून परतावे

  5. 5

    आता त्यात तयार फिश स्टॉक(1/2 कप फिश स्टॉक ग्रेव्ही साठी काढून घ्यावा), लिंबू रस व मीठ घालून एक मस्त उकळी येऊ द्यावी व नंतर त्यात निथळलेले तांदूळ घालून मोठ्या आचेवर 90% भात शिजवून घ्यावा. शिजलेला भात परातीत काढून पूर्ण ठंड होण्यास पंख्याखाली ठेवावा. असे केल्याने एकएक कण छान मोकळा होतो व भात जास्त निंबरून चिकट होत नाही.

  6. 6

    मॅरीनेटेड फिश ला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर लावून घ्यावे व कढीईत तेल चांगले तापवून त्यात मध्यम आचेवर तांबूस गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे.

  7. 7

    आता फिश ग्रेव्ही बनवावी... त्यासाठी कढीईत तेल तापल्यावर त्यात कांद्याची पेस्ट व आले लसुण पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परतावे व नंतर उरलेली सर्व टोमॅटो प्युरी व दही घालून छान एकजीव करून घ्यावे. आता लांबट चिरून हिरवी भोपळी मिरची घालावी

  8. 8

    आता उरलेला फिश स्टॉक, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, मीठ घालून एक मस्त उकळी येऊ द्यावी व नंतर त्यात तळलेली फीश घालून गॅस बंद करावा.

  9. 9

    लेयर साठी प्रथम पातेल्यात तूप लावून घ्यावे व त्यावर ठंड भाताची लेयर. केशर च्या पाण्यात 1 थेंब केवरा इसेंस घालून ढवळावे. त्यातले थोडे पाणी भाताच्या लेयर वर शिंपडावे, मग तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना पसरून दाबावे... त्यावर तयार सर्व फिश ग्रेव्ही ची लेयर लावावी... पुन्हा भाताची लेयर लावावी

  10. 10

    आता सगळे केशर पाणी, तळलेला कांदा, कोथिंबीर व पुदिना घालून पुन्हा छान दाबावे

  11. 11

    घट्ट झाकण ठेवून/लावून मंद आचेवर पातेल्या खाली तवा ठेवून 15 मिनिटे वाफेवर शिजन्यास ठेवावे. बिर्याणी अगदी गरम सर्व्ह करु नये... 10 मिनिटे वाफ मोकळी होऊ द्यावी व मग सर्व्ह करावे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipti Warange
Dipti Warange @cook_20705185
रोजी
कल्याण, मुंबई
By profession an HR and child counsellor, but switched to being a home maker and a dotting mother to my 4 year old daughter. Food is my special interest since childhood.. Food experimenting is hobby, currently own cooking classes and provide tiffin to little school going kids with varieties every day. This food legacy has been passed on by my mother to me and i hope to pass on the same to the next generation and next. My motto to join cookpad is to create my own beautiful food dairy as I progress to create my food blog too. Hope to meet all beautiful ladies out there on cookpad family🙏🙏
पुढे वाचा

Similar Recipes