मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#mfr
#वर्ल्ड_फूड_डे_स्पेशल
#माझी_आवडती_रेसिपी
#मशरूम_चिली
आपण रोज आपापल्या परीने पारंपरिक, पौष्टिक कधी सात्विक तर कधी व्हेज, नाॅनव्हेज पदार्थ चमचमीत, चटपटीत, तिखट, गोड अशा विविध प्रकारच्या चविंच्या रेसिपी बनवत असतो. कधी तरी बदल म्हणून बाहेर जाऊन हाॅटेलचे चमचमीत पदार्थ आवडीने खातो, पण नेहमीच बाहेरचे पदार्थ खायला बरे नाहीत. मग आपण ते पदार्थ आपल्याला जमतील तसे चवदार चविष्ट बनवून घरच्यांना खायला घालून खुष करण्याचा प्रयत्न करतो. मी असे वेगवेगळे प्रयोग किचनमधे करत असते, आणि ते सफल झाले की त्याचा आनंद होतो. असाच एक प्रयत्न मी पण करुन बघितला आणि छान जमला. तो पदार्थ म्हणजेच मशरूम चिली. आमच्या कडे मशरूम चिली खूप आवडते. मशरूम खायला पौष्टिक असल्यामुळे त्यापासून बनणार्या वेगवेगळ्या रेसिपी बनवायला मला खूप आवडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ४०० ग्रॅम मशरूम्स (२ पॅकेट्स)
  2. 2हिरव्या मिरच्या
  3. 2सिमला मिरच्या
  4. 2कांदे
  5. 2 टीस्पूनसोया सॉस
  6. 1 टीस्पूनरेड चिली सॉस
  7. 2 टीस्पूनटोमॅटो सॉस
  8. 1 टीस्पूनव्हिनेगर
  9. 2 टीस्पूनकाॅर्नफ्लावर
  10. 2 टीस्पूनमीठ
  11. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला लसूण
  12. 1 टीस्पूनबारीक किसलेलं आलं
  13. बारीक चिरलेला पातीचा कांदा
  14. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    मशरूम स्वच्छ धुवून त्याचे मोठे तुकडे करावे आणि पॅनमधे पाणी घालून त्यात मशरूम रंग बदलेपर्यंत शिजवून घ्यावे.

  2. 2

    कांदे आणि सिमला मिरच्यांचे मोठे तुकडे करुन घ्यावे. लागणारे साॅस काढून ठेवावे.

  3. 3

    कढईत तेल घालून त्यात २ हिरव्या मिरच्या मधे चिर पाडून परतून घेऊन मग बारीक चिरलेला लसूण आणि किसलेले आले घालून परतावे, लसूण ब्राऊन होईपर्यंत परतू नये. मग कांदे आणि सिमला मिरच्यांचे मोठे तुकडे घालून थोडेच परतावे म्हणजे क्रंची लागतात, जास्त परतून नरम करु नये. मग त्यात सोया सॉस आणि मीठ घालून मिक्स करावे.

  4. 4

    मग रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घालून मिक्स करून त्यात शिजवलेले मशरूम घालून परतावे. परतताना गॅस मोठाच ठेवून भराभर न करपू देता भाज्या परतून घ्याव्या.

  5. 5

    २ टीस्पून काॅर्नफ्लावर आणि २ टीस्पून पाणी चांगले मिक्स करावे, (गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी) काॅर्नफ्लावरचे पाणी भाजी मधे घालून भराभर परतावे, नंतर व्हिनेगर घालून मिक्स करावे आणि लगेचच गॅस बंद करावा. (भाजीमधे व्हिनेगर नेहमी शेवटी घालावे म्हणजे भाजी कडू होत नाही)

  6. 6

    एका प्लेटमधे गरमागरम मशरूम चिली घालून त्यावर बारीक चिरलेला पातीचा कांदा घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes