उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा(ukadlelya bhooemugachya shenga recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#कूूकस्नॅप मी ही रेसिपी अंजलीताई भाईक यांची कूकस्नॅप आहे. मला उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खूपच आवडतात. मलाच काय, आमच्या घरी सर्वांना फार आवडतात.
ह्या शेंगा खात असतांना मला आमच्या नागपूरची चौपाटी म्हणजेच फुटाळा लेकची खूपच आठवण येत आहे. सहसा आम्ही सायंकाळच्या वेळेला रविवारच्या दिवशी डे आऊट म्हणून जेव्हा फुटाळ्याला जातो तेव्हा फुटाळाचा सन सेट बघता-बघता उकळलेल्या शेंगा खात असतो. आज मी खूप मिस करते आहे, फुटाळा ,तिथल्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, कच्चा चिवडा, आमच्या नवरोबाचे आवडते फिंगर्स सगळं सगळं खूप मिस करत आहे.
कब आयेंगे वो दिन ?😔

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोभुईमुगाच्या शेंगा
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 2 टेबलस्पूनमीठ
  4. उकळण्यासाठीपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम भूईमुगाच्या शेंगांना स्वच्छ धुऊन घ्यावे. व कुकर मध्ये पाणी टाकून त्यामध्ये मीठ हळद टाकून एक शिट्टी होईस्तोवर उकळू द्यावे. मग गॅस बंद करून घ्यावा.

  2. 2

    नंतर एका चाळणी मध्ये शेंगा काढून घ्याव्यात व हिरवी चटणी किंवा लाल मिरचीचा ठेचा, शेजवान चटणी त्याच्यासोबत भुईमुगाच्या शेंगा खाण्याचा आनंद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes