शेंगुळी (shengooli recipe in marathi)

shamal walunj
shamal walunj @cook_24273132

#रेसिपीबुक #week1
माझा आवडता पदार्थ १
मला शेंगुळी खूप आवडते,अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ आणि आईच्या हातची शेंगूळी जगात भारी...मला आई इतकी छान येत नाही,पण प्रयत्न केला,आई सारखी नाही झाली. पण आवडीचा पदार्थ असल्यामुळे सपाटून जेवले😋

 शेंगुळी (shengooli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1
माझा आवडता पदार्थ १
मला शेंगुळी खूप आवडते,अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ आणि आईच्या हातची शेंगूळी जगात भारी...मला आई इतकी छान येत नाही,पण प्रयत्न केला,आई सारखी नाही झाली. पण आवडीचा पदार्थ असल्यामुळे सपाटून जेवले😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 1/2तास
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपहुलग्याचे (कुळीथ) पीठ
  2. 20-25लसूण पाकळ्या
  3. 2 टीस्पूनमिरची पावडर
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टेबलस्पूनमिठ
  6. 4 टेबलस्पूनशेंगदाणा कुट
  7. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

1 1/2तास
  1. 1

    लसूण,लाल मिरची पावडर,जिरे,मीठ थोडं पाणी टाकून मिक्सर मधून बारीक करून घेणे, नंतर हूलग्याचे पीठ एका परातीत घेऊन सगळे वाटलेले मिश्रण व्यवस्थित कालवून गोळा तयार करून घेणे.

  2. 2

    एकीकडे गॅसवर 8-10 कप पाणी गरम करायला ठेवून त्यात थोडे मीठ व तेल टाकावे, पाण्याला उकळी येईपर्यंत शेंगुळी बनवून घ्यावी.हातावर बनवता येत नसेल तर पोळपाटावर पण बनवु शकतो. थोडेसे पीठ तसेच ठेवावे.

  3. 3

    नंतर शेंगुळी उकळी आलेल्या पाण्यात सोडून,झाकण ठेवून मीडियम गॅसवर 20 मिनिटे शिजू द्यावि, चांगली शिजल्यावर त्यात थोडे शिल्लक ठेवलेले पीठ पाण्यात मिसळून,शिजत असलेल्या शेंगुळीत टाकावे.

  4. 4

    व शेंगदाणा कुट टाकून मंद आचेवर 15 मिनिटे शिजू द्यावी.

  5. 5

    अशाप्रकारे शेंगुळी खाण्यासाठी तयार आहे. बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
shamal walunj
shamal walunj @cook_24273132
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes