पोट्याटो चीज कोफ्ता(potato cheese kofta recipe in marathi)

Tanaya Vaibhav Kharkar
Tanaya Vaibhav Kharkar @cook_24417066
Kalyan

#कोफ्ता
रोज काय करायच हा प्रश्न असतोच. आणि घरातील मंडळींना काही तरी नवीन चटपटीत खायचे असेल तर हा पदार्थ नक्कीच सगळ्यांच्या पसंतीला उतरतो.

पोट्याटो चीज कोफ्ता(potato cheese kofta recipe in marathi)

#कोफ्ता
रोज काय करायच हा प्रश्न असतोच. आणि घरातील मंडळींना काही तरी नवीन चटपटीत खायचे असेल तर हा पदार्थ नक्कीच सगळ्यांच्या पसंतीला उतरतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30  मिनिटे
3 लोकांसाठी
  1. 400 ग्रॅमबटाटे
  2. 1 वाटीकांदा चिरलेला
  3. 1/2 वाटीटोमॅटो चिरलेला
  4. 1/2 वाटीमैदा
  5. 1/2 वाटीबेसन
  6. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनचाट मसाला
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टीस्पूनदही
  12. 3 चीज क्युब
  13. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली सिमला मिर्ची

कुकिंग सूचना

30  मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम बटाटे उकडून घ्या. उकडलेल्या बटाट्याची साले काढून ते कुस्करून घ्या.

  2. 2

    कुस्करलेल्या बटाट्यात बेसन पीठ, मैदा, लाल तिखट, कोथिंबीर,आल लसूण पेस्ट मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या

  3. 3

    चीजचे बारीक तुकडे करून घ्या किंवा किसून घ्या. एका ताटलीत कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, चीज एकत्रित करा. त्यात दही चाट मसाला मसाला घालून मिक्स करा.

  4. 4

    मळून ठेवल्या बटाट्याचे हाताला तेल किंवा तूप लावून माध्यम आकाराचे गोळे करून त्या गोळ्याला बोटाने भोक पाडून वाटी सारखे करा व चीजचे मिश्रण भरून गोळा बंद करून घ्या.

  5. 5

    एका कढईत तेल गरम करून घ्या. तयार गोळे मैद्यात बुडवून तेलात सोडा. 5 मिनिटे मंद आचेवर नीट तळून घ्या. म्हणजे कोफ्ता तयार होईल..

  6. 6

    तयार कोफ्ता सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tanaya Vaibhav Kharkar
Tanaya Vaibhav Kharkar @cook_24417066
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes