बीटरूट कोफ्ताकरी (beetroot kofta curry recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#कोफ्ता
मधे एकदा टीव्हीवर किचन रूल्स हा कार्यक्रम बघत असताना मुलगी म्हणाली आपण पण असा 7 कोर्स मील सर्व्ह केल तर आणि लगेच ठरल.तर ह्या सेव्हन कोर्स मील मधल्या मेन कोर्स ला सर्व्ह केलेली ही बीटरूट कोफ्ताकरी
#कोफ्ता

बीटरूट कोफ्ताकरी (beetroot kofta curry recipe in marathi)

#कोफ्ता
मधे एकदा टीव्हीवर किचन रूल्स हा कार्यक्रम बघत असताना मुलगी म्हणाली आपण पण असा 7 कोर्स मील सर्व्ह केल तर आणि लगेच ठरल.तर ह्या सेव्हन कोर्स मील मधल्या मेन कोर्स ला सर्व्ह केलेली ही बीटरूट कोफ्ताकरी
#कोफ्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2बीटरूट कोफ्ते: मध्यम आकाराचे बीट
  2. 1मध्यम आकाराचे गाजर,
  3. 2बटाटे उकडून मँश केलेले,
  4. 2टीस्पून लसुण,आल व हिरवीमिरची पेस्ट,
  5. 2टेबलस्पून काँर्नफ्लोर (कोफ्ते मिळुन येण्यासाठी)
  6. ग्रेव्हीसाठी साहित्य:
  7. 4-5मोठे टोमॅटो
  8. 2.5-3कप पाणी,
  9. 3लसूण पाकळ्या,
  10. 1इंच आल,
  11. 2हिरव्या मिरच्या,
  12. 5हिरव्या वेलची,
  13. 3मिरे,
  14. 1इंच दालचिनी,
  15. 2टेबलस्पून लोणी,
  16. 1/4कप दूध,
  17. 2-3टेबलस्पून क्रीम,
  18. 2-3टीस्पून मध,
  19. 1टीस्पून कुसुरी मेथी,
  20. 1टीस्पून धणे पावडर,
  21. 1/4टीस्पून गरम मसाला पावडर
  22. 1/2टीस्पून कास्मिरी लाल तिखट पावडर,
  23. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    बीट स्वच्छ करून अँल्युमिनीयम फाँईलमधे रँपकरून ओव्हनमधे 110℃ 10-15 मिनिटे बेक करून घ्या थंड झाल्यावर सालपट काढून किसुन घ्या

  2. 2

    पँनमधे गाजर कीसुन,किसलेल बीट,बटाटे परतून नीट एकत्र करून त्यात आल,लसुण, हिरवीमिरची पेस्ट,मीठ घालून लागेल तस काँर्नफ्लोर घालून मळुन त्याचे कोफ्ते करून तेलात तळून घ्या.

  3. 3

    ग्रेव्हासाठी: प्रेशर कूकरमध्ये टोमॅटो आले, लसूण, हिरवी मिरची, हिरव्या वेलची आणि मिरे घालुन २ शिट्टया करा.
    हे ब्लेंडरमध्ये फिरवुन ते गाळुन घ्या.

  4. 4

    आता पॅन मध्ये तयार प्युरी,मीठ, कोथिंबीर, कश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला घाला. मध्यम आचेवर 5 मिनिटे उकळी येऊ द्या आता लोणी, दूध आणि क्रीम घालुन 5 मिनिटे उकळत ठेवा.मध, कसूरी मेथी घाला आणि करी घट्ट होईपर्यंत उकळत ठेवा.विलायची पावडर आणि गरम मसाला पावडर घाला आणि आणखी 2 मिनिटे उकळत ठेवा.

  5. 5

    आता प्लेट मधे करी घालून त्यावर बीट कोफ्ते ठेऊन लच्छा पराठ्यासह सर्व करा. # कोफ्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes