कोकोनट चॉकलेटी केक (coconut chocolate cake recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

आता सद्या ची परिस्थिती अशी आहे की सारखे सारखे बाहेर जाऊन समान नाहीं आणू शकत,
त्यामुळे मुलांना दुधा सोबत बिस्कीट वगैरे काहीही नसते..
म्हणून मी केक करून ठेवते ,
म्हणजे मुलांना सकाळी सकाळी दुधा सोबत बिस्कीट चा ऐवजी केक बेस्ट राहील.
आणि मुलांचा केक पाहून आनंद दुप्पट होऊन जातो..
आहे ना छान आयडिया,,,

कोकोनट चॉकलेटी केक (coconut chocolate cake recipe in marathi)

आता सद्या ची परिस्थिती अशी आहे की सारखे सारखे बाहेर जाऊन समान नाहीं आणू शकत,
त्यामुळे मुलांना दुधा सोबत बिस्कीट वगैरे काहीही नसते..
म्हणून मी केक करून ठेवते ,
म्हणजे मुलांना सकाळी सकाळी दुधा सोबत बिस्कीट चा ऐवजी केक बेस्ट राहील.
आणि मुलांचा केक पाहून आनंद दुप्पट होऊन जातो..
आहे ना छान आयडिया,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1/2साखर
  3. 1/2 कपदूध
  4. 1/4 कपकोकोनट ऑइल
  5. 1/2 कपचॉकलेट
  6. 3/4 टेबल स्पूनबेकिंग पावडर
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1 टिस्पून व्हॅनिला इसेन्स
  9. 1/2 कपखोबरा कीस
  10. केक ला डेकोरेट करण्यासाठी,....
  11. 1/2 कपचॉकलेट
  12. 3 टेबलस्पूनक्रीम मिल्क
  13. 1 टेबलस्पूनकेक स्प्रिंकल
  14. 3 टेबलस्पूनचॉकलेट सिरप

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    एका बाउल मध्ये मैदा आणि पिठीसाखर गाळून घेणे, त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेणे,,

  2. 2

    मैदा, पिठी साखर,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चांगले मिक्स करून घेणे, आता त्यामध्ये खोबरा कीस आणि कोकोनट ऑइल घालून चांगले मिक्स करायचं,,,

  3. 3

    चॉकलेट मेल्ट करून या सारणामध्ये घाला, आणि मिक्स करा, केक च्या बाऊल ला ग्रीस करून घेणे,,,

  4. 4

    आता या बॅटल ला बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेणे, आणि बेक करण्यास कन्वेक्शन मोड वर 160 डिग्री वर पंचवीस मिनिटासाठी बेक करण्यास ठेवून देणे, केक बेक होण्याचे टाइमिंग कमी जास्त होऊ शकतात,

  5. 5

    आता आपला केक तयार आहे, त्याच्यावर मेल्टेड चॉकलेट टाकण्यासाठी, एका बाहुल मध्ये चॉकलेट घेणे त्याच्यामध्ये क्रिमि मिल्क घालून घेणे,,

  6. 6

    आता क्रीम मिल्क, चॉकलेटला 30 सेकंद साठी मायक्रोवेव्ह करून घेणे, आता हे मेल्ट झालेले चॉकलेट आपल्या केक वर पसरून देणे...

  7. 7

    आत्ता केक ला डेकोरेट करायचे, केक स्प्रिंकल ने त्याला सजवायचे, आणि त्याचे पिसेस करून त्याच्यावर मेल्टेड चॉकलेट घालायचे, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कसलीही सजावट करू शकता,, छान चॉकलेटी कोकोनट चा यम्मी केक तयार आहे,,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes