चंद्रकोर व्हॅनिला केक (vanilla cake recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक
#चंद्रकोर रेसिपीज
#Week6
रेसिपी बुक यामध्ये चंद्रकोर या थीम मुळे काहीतरी वेगळं केल्या जात आहे..
कधी विचार केला नव्हता मी की मी असला छान सुंदर चंद्र कोर चा केक करू शकेल..
पण कूक पॅड च्या थीम निमित्ताने हे केल्या गेल..
आमच्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करायची ती आता आपण सगळेजण करतात..
पण आमच्या वेळेची त्यावेळेची कोजागिरी पौर्णिमा अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने होत असे,
एक महिना आम्ही भुलाबाई चे गाणे रोज सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मनत असो..
आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई च्या मुर्त्या म्हणजे शंकर-पार्वतीची मूर्ती बसून त्यांची पूजा केली जात असे, आणि सर्वजण टेरेस वर जमा व्हायचे आणि तिथे सगळेजण आपला आपला खाऊ आणत असे,
आणि प्रत्येक जण डबा हलवून खाऊ ओळखा असं म्हणत असे ..
आणि गेम खेळत असे...
आणि कोजागिरी ला दूध आठवण्याचा कार्यक्रम जोरात करायचा..
खूप मजा मस्ती गाणे म्हणणे हे सगळे व्हायचे..
नंतर रात्रीचे बारा वाजले की ते चंद्राचं प्रतिबिंब त्या आटवलेल्या दुधात पडावं ही प्रथा अजूनही चालू आहे,
आणि ते प्रतिबिंब दुधामध्ये पडल्यावरच दूध सगळेच प्यायचे...
खुपच छान मस्त कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम चालायचं,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिन
6 सर्व्हिंग्ज
  1. चंद्रकोर बनवण्यासाठी
  2. 1/2 कपमैदा
  3. 2 टेबलस्पूनकोकोनट ऑइल
  4. 1/4 कपदूध
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. 1/4 कपपिठीसाखर
  8. 1/2 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  9. बॅकग्राऊंड बनवण्याचा केक,,,
  10. 1 कपमैदा
  11. 1/3 कपसाखर
  12. 1/4 कपकोकोनट ऑइल
  13. 1/3 कपदूध
  14. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  15. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  16. आयसिंग करण्याकरिता
  17. 1 कपविपः क्रीम
  18. एडीबल ब्लू कलर
  19. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

1 तास 30 मिन
  1. 1

    सर्वप्रथम मैदा पिठीसाखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, हे गाळून एका बाऊलमध्ये ठेवावे, आता त्यामध्ये ऑइल,, व्हॅनिला इसेन्स आणि दूध घालून चांगले मिक्स करावे..

  2. 2

    आता सिलिकॉन च्या मोल्ड ला ग्रीस करून घ्यावं आणि त्यामध्ये हे बँटल घालून ओवन मध्ये कन्वेक्शन मोडवर 160 डिग्रीवर 30,ते35 मिनिटासाठी बेक करून घ्यावे,. केक बेक झाल्यावर त्याला पंधरा ते वीस मिनिटं थंड होण्यास ठेवून द्या, थंड झाल्यावर त्याला चंद्र कोर च्या आकारासारखा कट करून घ्या,

  3. 3

    आता दुसरा केक तयार करून घ्यायचं त्याच्यासाठी केकटीन ला ग्रीस करून घ्यावे किंवा बटर पेपर घालून त्याला रेडी ठेवणे.. आता सर्व ड्राय इन्ग्रेडियंट हे चाळणीने गाळून घ्यावे, आता या ड्राय इन्ग्रेडियंट मध्ये कोकोनट ऑइल, दूध,, व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करून घ्यावे..

  4. 4

    ग्रीस केलेल्या केक टीन मध्ये केकचे बॅटल घालावे, आणि कन्वेक्शन मोडवर 160 डिग्रीवर तीस ते पस्तीस मिनिटांसाठी बेक करून घ्यावे,

  5. 5

    आता केक रेडी आहे त्याला थंड करून घ्यावे, वीप क्रीम ला बिटर च्या साह्याने फेटून घ्या, क्रीमने केकला क्रम कोट करून घ्या,

  6. 6

    त्यानंतर केक ला आकाशाचा रंग देण्यासाठी ब्ल्यू वाईट विप मध्ये मिक्स करून घ्या, आणि पेंट करतो तसं आयसिंग करून घ्या,

  7. 7

    आणि चंद्रकोर जी आपण पहिल्या केक मधून कट केलेली आहे, तिला वाईट क्रीम ने कोट करून घ्यावे. आणि छोट्या-छोट्या चांदण्या आयसिंग ने करून घ्या, आता छान निळा आकाशामध्ये चंद्रकोर आणि चांदण्या असा आपला केक आता तयार आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes