सुशीला.....मराठवाडा स्पेशल.(sushila marathwada special recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

नाश्त्यासाठी एक उत्तम आणि हेल्दी ऑप्शन. आपण नाश्त्याला पोहे बनवतो तसाच बनवायचं फक्त पोह्या ऐवजी कुरमुरे वापरायचे.आणि फुटाणा डाळ घालायची..चवीला खूप छान लागतो आणि झटपट होतो.

सुशीला.....मराठवाडा स्पेशल.(sushila marathwada special recipe in marathi)

नाश्त्यासाठी एक उत्तम आणि हेल्दी ऑप्शन. आपण नाश्त्याला पोहे बनवतो तसाच बनवायचं फक्त पोह्या ऐवजी कुरमुरे वापरायचे.आणि फुटाणा डाळ घालायची..चवीला खूप छान लागतो आणि झटपट होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनीटे
  1. 2 कपकुरमुरे
  2. 1कांदा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 6-7कडीपत्ता पाने
  8. चिमूटभरहिंग
  9. 1/4 टीस्पूनमीठ...आवडीनुसार कमी जास्त घालावे
  10. 1 टीस्पूनसाखर...आवडत असल्यास
  11. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  12. 1/2 टेबलस्पूनलिंबूरस

कुकिंग सूचना

५-७ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    कुरमुरे पाण्यात घालून धुवून लगेच काढून बाजूला ठेवले.

  3. 3

    कांदा,मिरची,कोथिंबीर चिरली, फुटाणा डाळ भरड वाटून घेतली, दाण्याचे कूट करून घेतले.

  4. 4

    कढईत तेल घेऊन त्यात जीरे,मोहरी घालून ते तडतडल्यावर त्यात मिरची,कडीपत्ता,कांदा घालून छान परतले.नंतर त्यात हिंग आणि हळद घातली.

  5. 5

    ह्यामध्ये धुतलेले कुरमुरे, फुटाणा डाळ भरड,दाण्याचे कूट,मीठ,साखर,कोथिंबीर घालून नीट परतले. १-२ मिनिटांसाठी झाकण ठेऊन वाफ दिली.सगळ्यात शेवटी लिंबूरस पिळून मिक्स केले.

  6. 6

    तयार सुशीला बाउल मध्ये काढून सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes