तिळकूट (कारळे तिळाची चटणी) (karale chi chatani recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week2
#गावाकडचीआठवण
लहानपणी मे महिन्यात गावाला गेल्यावर काकू हमखास काही पदार्थ करायची त्यात हे तिळकूट असायचं. कारळे तीळ आणि खोबरं घातलेली ही सुकी चटणी मागच्या पडवीत जमिनीत पुरलेल्या वायनात कुटून केली जायची. त्याची चव मिक्सरमधल्या चटणी पेक्षा फारच छान असायची. मग गावी असेपर्यंत प्रत्येक जेवणात ही चटणी तोंडीलावणं म्हणून असायचीच. 
कारळे तीळ काळे आणि लांबडे असतात. वाण्याच्या दुकानात ह्याला खुरासणी म्हणतात (गुजराती नाव). साधे काळे तीळ वापरून सुद्धा ही चटणी बनवू शकता पण कारळे तीळ वापरून चव आणि टेक्सचर छान येतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकिसलेलं सुकं खोबरं दीड
  2. 1 कपकारळे तीळ
  3. 3/4 कपलसूण
  4. चमचालाल तिखट दीड
  5. १ चमचाचिरलेला गूळ (आवडत असेल तर)
  6. १ चमचाचिंच / आमचूर अर्धा चमचा
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    तीळ खमंग भाजून घ्या आणि गार करा.

  2. 2

    सुकं खोबरं खमंग भाजून घ्या आणि गार करा.

  3. 3

    खोबरं आणि तीळ मिक्सर मध्ये वेगवेगळे वाटून घ्या. तीळ जरा जाडसर ठेवा.

  4. 4

    लसूण कुटून / मिक्सर मध्ये बारीक घ्या. त्यात चिंच / आमचूर, तिखट, मीठ, गूळ घालून मिक्स करा.

  5. 5

    खोबरं व तिळाची पूड घालून एकत्र करा. मिक्सर मध्ये अर्धा मिनिट पल्स मोड वर फिरवा.

  6. 6

    खमंग, चविष्ट तिळकूट तयार आहे. कशाही बरोबर ही छान लागते.

  7. 7

    टीप - चटणीचं  टेक्सचर तुम्ही कोणते तीळ घालता त्यानुसार बदलतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes