पापड भाजी (papad bhaaji recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#रेसिपीबुक #week4 माला ही राजस्थनी भाजी टेस्ट करायची होती. सो अशी संधी मिळाली त्यामुळे माला ही बनवून करायची संधी मिळाली व खाल्ली फारच मस्त. लागतेe. माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता सो स्पेशल भाजी त्याच्यासाठी बनवून खूप आनंद वाटला व त्यांना पण ही खूप आवडते. त्यांना तर हे सरप्राईझ फारच आवडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-18 मिनिटं
3  सर्व्हिन्ग
  1. 20 ग्रॅमपापड (4-5नग )
  2. 4 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1 टीस्पूनजिरं
  5. 1 टीस्पूनहिंग
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  10. 1 टीस्पूनआलं किस
  11. 1 टीस्पूनलसूण ठेचून
  12. 1 टीस्पूनहिरव्या मिरचीचे तुकडे
  13. 1/4 कपटोमॅटो बारीक चिरून
  14. 1/4 कपकांदा बारीक चिरून
  15. 1 टीस्पूनकोथिंबीर
  16. 1 टीस्पूनकडीपत्ता
  17. चवीनुसारमीठ
  18. 11/2 कपपाणी
  19. 1 कपदही

कुकिंग सूचना

15-18 मिनिटं
  1. 1

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. आलं किसून घ्या. मिरची कापून लसूण ठेचून घ्या. पापड भाजून घ्या.

  2. 2

    आता पॅन मध्ये तेल गरम झाले की फोडणी द्या. लसूण आलं मिरची घाला कांदा टोमॅटो घाला छान परता.

  3. 3

    परतून झाले की मग सर्व मसाले घाला पुन्हा परता मग दही घाला. उकळी आली की पाणी ऍड करा.

  4. 4

    मीठ ऍड करा. पापड सॉल्टी असतात. त्या हिशोबाने मीठ वापरा. सर्व छान एकजीव झाले की मग त्यात पापड घाला 4 मिनिटं होऊ द्या. मग आपली पापड भाजी तयार झाली.

  5. 5

    ही यम्मी पापड भाजी एका बाउल मध्ये काढा व गरम गरम सर्व्ह करा. ही अनोखी भाजी माझ्या मिस्टरांनी फार एन्जॉय केली खूप सुंदर झालेली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes