कोल्हापुरी शाही पांढरा रस्सा शाकाहारी (veg kolhapuri pandhra rassa recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#रेसिपीबुक
#week4
काही वर्षांपूर्वी कोल्हापूर नजीक पन्हाळगडाच्या पायथ्याशी एका विस्तीर्ण शैक्षणिक संस्थेमध्ये तीन ते चार दिवस कार्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाण्याचा योग आला .तिथे काय खाण्यापिण्याची चंगळ होती .सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कोल्हापुरी पदार्थांची रेलचेल होती .समारोपाच्या दिवशी आम्हाला कोल्हापुरी पाहुणचार झाला. त्या पाहुणचारातल्या पांढर्‍या रस्स्यामध्ये मी फक्त पोहायची बाकी राहिले होते.. किती वाट्या पोटात रिचवल्या आठवत नाही, त्यापूर्वी पांढरा रस्सा बद्दल फक्त ऐकून माहिती होती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2ओले नारळ
  2. 8 ते 10 काजूबिया भिजवलेल्या
  3. 1 टी स्पूनखसखस भिजवलेली
  4. 1 टी स्पूनतीळ भिजवलेले
  5. 1 टी स्पूनधणे
  6. 1 टी स्पूनजिरे
  7. 2लवंगा
  8. 4 ते 5 मिरी
  9. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  10. 3 ते 4 तमालपत्र
  11. 10-12लसूण पाकळ्या
  12. 1 इंचआलं
  13. 4हिरव्या मिरच्या
  14. 1 टीस्पूनमीठ
  15. 1 टेबल स्पूनसाजूक तूप
  16. 1 टेबल स्पूनस्वीटकॉर्न
  17. 1मोठा बटाटा
  18. 1मध्यम आकाराचे गाजर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम एका पॅन मध्ये थोडे तूप घेऊन धणे व जिरे थोडे भाजून घ्यावे हे भाजलेले धणे जिरे मिक्सरच्या पॉट मध्ये घेऊन त्यामध्ये भिजवलेले काजू खसखस तीळ लसुण आलं थोडे मिळाले दालचिनी व लवंग घेऊन पेस्ट करुन घ्यावी एकीकडे नारळाचे दूध तयार करून घ्यावे व भाज्या पाचपट पाण्यामध्ये उकळून घ्यावे (या भाज्यांमध्ये आपण फ्लॉवर,ब्रोकोली,पत्ताकोबी, हिरवे वाटणे सुद्धा ॲड करू शकतो)भाज्यांचे हे उकळलेले पाणी आपल्याला व्हेजिटेबल स्टॉक म्हणून वापरायचे आहे.

  2. 2

    आता त्याच पॅनमध्ये साजूक तूप घेऊन थोडे जिरे,मिरे,लवंग, हिरवी मिरची,तमालपत्र, घालून त्यावर काजू पेस्ट घालावी व त्याच वेळेस उकडलेल्या भाज्या सुद्धा ॲड कराव्यात.आता हे सर्व पाच मिनिट परतून घ्यावे,जोपर्यंत पेस्ट खरपुस होणार नाही. त्याच वेळेस मीठ घालावे.

  3. 3

    आता यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक घालून छान उकळ्या येऊ द्याव्यात,त्यानंतर थोड्यावेळाने नारळाचे दूध ऍड करून थोड्यावेळातच गॅस बंद करावा.आपला शाही पांढरा रस्सा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes