अंड्याचा पांढरा रस्सा (अंडा करी) (anda curry recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#cf
#Andacurry
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती इतर खाद्यसंस्कृतीपेक्षा थोडी वेगळी आहे. वेगळी आणि वेगळेपणा टिकवणारी आहे. बदलत्या काळातही हे वेगळेपण कायम राहिले आहे. कोल्हापुरी 'ठसका, 'झटका', 'भुरका' ही खाद्यसंस्कृतीची वैशिष्टये. मांसाहार आणि कोल्हापूर यांचे नाते पिढ्यानपिढ्याचे आहे. घरात एखादा पाहुणा आला आणि त्याला मटणाचा पाहुणचार केला नाही तर त्या पाहुण्याचा अपमान समजतात. बारसे, केळवण, जावळ वाढदिवस अशा समारंभातही मांसाहारी जेवणाला प्राधान्य असते.
घरगुती मसाल्याने जेवण चविष्ट बनते, झणझणीत रस्स्यामुळे घामाच्या धारा कपाळावरून वाहत राहिल्या तरी रस्साच्या वाटीची चव परत परत जिभेला खुणावेल अशा चवीचा तांबडा रस्सा असतो त्यावर उतारा म्हणून पांढरा रस्साही त्याबरोबर सर्व्ह करतात आपण चिकनचा तांबडा पांढरा रस्सा किंवा मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असे कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमधले पदार्थ ऐकले आहेत परंतु तिथे अंड्याचाही पांढरा रस्सा बनवला जातो तो कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवते आहे, चला तर मग बघुया कोल्हापुरी अंड्याचा पांढरा रस्सा😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 6उकडलेली अंडी
  2. 1मोठ्या नारळाचे काढलेले दूध
  3. 1/2 वाटीकाजू पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनआलंलसूण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनतीळ, खसखस भिजत घालून केलेली पेस्ट
  6. 4हिरव्या मिरच्या बिया कादून उभ्या चिरलेल्या
  7. 2लवंगा
  8. 3दालचिनीचे तुकडे,
  9. 2मिरी
  10. 2वेलदोडे
  11. तूप
  12. मीठ

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करावे. अंडी उकडून घ्यावीत. काजू अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवावे तसेच तीळ आणि खसखसही एकत्रित पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवावी त्यानंतर काजू आणि खसखस तीळाची एकत्रितपणे पेस्ट तयार करून घ्यावी.

  2. 2

    नारळाचा दुधामध्ये काजू पेस्ट आणि तीळ, खसखस पेस्ट टाकून सर्व नीट मिक्स करून घ्यावे. पॅनमध्ये तूप टाकून गरम करा. त्यात लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडे टाका. तडतडल्यावर आलंलसूण पेस्ट टाकून परता. त्यामध्ये नारळाचे दूध व काजू पेस्ट टाकून मीठ टाका. १/२ वाटी पाणी टाका. उकळी येऊ द्या.

  3. 3

    उकडलेल्या अंड्याला एका बाजूने सुरीने थोडा छेद द्या व रश्यात टाका. उकळी आल्यावर गॅस बंद करा. फोडणी पात्रात थोडे तूप टाकून त्यात उभ्या चिरलेल्या मिरच्या टाका व रंग न बदलता थोड्या परतून रश्यात टाका. पांढऱ्या रश्यात हिरव्या मिरच्या छान दिसतात. कोल्हापुरी तडकेबाज अंड्याचा पांढरा रस्सा तयार आहे, गरमागरम सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes