दूधी कोफ्ता (dudhi kofta recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#कुकस्नॅप
#शीतल पाटील
#फोटोग्राफी वर्कशाॅप

दूधी कोफ्ता (dudhi kofta recipe in marathi)

#कुकस्नॅप
#शीतल पाटील
#फोटोग्राफी वर्कशाॅप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४-५
  1. कोफ्ता साहित्य :
  2. 1/2दूधी किसलेला
  3. 1/2 कपबेसन
  4. 1/2 कपतांदूळ पीठ
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1बारिक चिरलेला कांदा
  7. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  8. 1 टीस्पूनधणे जिरे पूड
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  13. 2 टीस्पूनतेल
  14. तळण्यासाठी तेल
  15. ग्रेव्ही साठी साहित्य :
  16. 1कांदा उभा चिरलेला
  17. 2टोमॅटो उभे चिरलेले
  18. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  19. 1/2 कपमलई
  20. 7-8कढीपत्ता पाने
  21. 1/4 टीस्पूनमोहरी
  22. 1/4 टीस्पूनजिरे
  23. 1/4 टीस्पूनहिंग
  24. 1/4 टीस्पूनओवा
  25. 1/4 टीस्पूनबडीशेप
  26. 1/4 टीस्पूनतिळ
  27. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  28. 1 टीस्पूनलाल तिखट
  29. 1/2 टीस्पूनधणे जिरे पूड
  30. 1/2 टीस्पूनहळद
  31. 1 टीस्पूनघरगूती मसाला
  32. 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  33. 2 टेबलस्पूनतेल
  34. 1 टीस्पूनसाखर
  35. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    नमूद केलेले साहित्य फोटोमध्ये दाखविले आहे. दूधी किसून गघ्या. दूधाचे पाणी पिळू नका. कोल्स्टाॅल कंट्रोल करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. कोफ्त्यासाठी कांदा बारिक चिरून घ्या. मलई ऐवजी शीतल मॅडमनी काजू वापरले आहेत ते ही छान लागतील.

  2. 2

    एका खोलगट भांड्यात दूधी किसून घ्या, यांत सर्व मसाले घाला. यांवर बेसन व तांदूळ पीठ घालून घ्या.

  3. 3

    यांवर आले लसूण पेस्ट, कांदा व कोथिंबीर, मीठ तसेच थोडे तेल घाला.

  4. 4

    हे पीठ मळून घ्या, वेगळ्या पाण्याची आवश्यकता नाही. दूधाचे स्वतःचं पाणी पूरे होईल. यांचे लंबगोल गोळे करून घ्या. कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करा.

  5. 5

    सोनेरी रंगावर कोफ्ता तळून घ्या.

  6. 6

    आत्ता ग्रेव्हीची तयारी करूया. कढईतील अतिरिक्त तेल काढून घ्या. उरलेल्या साधारण दोन टेबल स्पून तेलात फोडणी करून घ्या. गॅस मंद असू द्या. मोहरी, जिरे, हिंग, ओवा, बडीशेप, तीळ यांची क्रमाक्रमाने फोडणी करा, यांत कढीपत्ता व कोथिंबीर देखील घाला. आले लसूण पेस्ट ही फोडणीमध्ये सोडा. यांवर कांदा, टोमॅटो घालून परतून घ्या. वर लाल तिखट, मसाला. मीठ, हळद, धणे जिरे पूड, हळद, साखर कसूरी मेथी घालून तेल सुटे तोवर परतून घ्या.

  7. 7

    कांदा नरम झाला की यांत एक चमचा मलई घाला. पुन्हा छान परतून घ्या. गॅस बंद करा. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या.

  8. 8

    मिश्रण फाईन पेस्ट करून घ्या. कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन यांवर लाल तिखट फोडणीस सोडा.

  9. 9

    यांवर कोफ्ता सोडा. थोडे परतून यांवर कांद्याची पेस्ट घालून एक उकळी येऊ द्या.

  10. 10

    वरून थोडी कोथिंबीर व मलई घालून एक उकळी घेऊन गॅस बंद करा. गरमागरम पोळी, वाफाळलेल्या भातासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

Similar Recipes