व्हेजिटेबल क्रिस्पी (vegetable crispy recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#रेसिपीबुक #week5 क्रिस्पी अश्या भाज्या, गरमागरम अशी भाजी खाण्यासाठी मस्त पदार्थ. थंडगार पावसाळ्यात असा पदार्थ जिभेला वेगळीच चव देतो

व्हेजिटेबल क्रिस्पी (vegetable crispy recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5 क्रिस्पी अश्या भाज्या, गरमागरम अशी भाजी खाण्यासाठी मस्त पदार्थ. थंडगार पावसाळ्यात असा पदार्थ जिभेला वेगळीच चव देतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1 कपकॉर्नफ्लॉवर
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 1/2 कप गाजर
  6. 1/2 कपफ्लॉवर
  7. 1/2 कपसिमला मिरची
  8. 1/2 कपबटाटे
  9. 1/2 कपमशरुम
  10. 1/2 कपकांद्याची पात
  11. 1 टीस्पूनमिरी पावडर
  12. 2 टीस्पूनमीठ
  13. 1 टीस्पूनसाखर
  14. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  15. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  16. 2 टीस्पूनआले लसुण पेस्ट

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    एका बाऊल मध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीठ व मिरी पावडर घालून मिक्स करावे. नंतर त्यात पाणी घालून मिक्स करावे. भजीच्या पीठासारखे बॅटर तयार करावे.

  2. 2

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यावे. नतंर त्याचे लांब तुकडे करुन घ्यावे. व तयार केलेल्या बॅटर मध्ये बुडवून ठेवले.

  3. 3

    कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये बॅटर मध्ये बुडवून भाज्या तळुन घ्यावे.

  4. 4

    कढईत 1 टेबलस्पून तेल घालून चांगले गरम करावे. त्यात उभा कांदा चिरलेला घालून चांगला परतून घ्यावे. टोमॅटो बारीक चिरून घालावे. आले लसुण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात सॉस घालावे. मीठ व साखर घालून चांगले परतून घ्यावे.

  5. 5

    चांगले परतून झाल्यावर तळलेली भजी त्यामध्ये घालावे. चांगले परतुन घ्यावे. नतंर त्यामध्ये कांद्याची पात व कोथिंबीर घालून मिक्स करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes