चिकन पॉपकॉन (chicken popcorn recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#रेसिपीबुक #week5
पावसाळा म्हटला की गरमागरम भजी आणि चहा.. पण आमच्या घरी हे असे चिकनचे पॉपकॉन खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर मुसळधार पाऊस आणि गरम-गरम चिकन पॉपकॉर्न त्याची मजा काही औरच आहे. माझी दोन्ही मुलं पाऊस पडला रे पडला की चिकन पटकन बनवण्यासाठी हट्ट करतात. मग काय गरमागरम चिकन पॉपकॉन बनवायचे.

चिकन पॉपकॉन (chicken popcorn recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळा म्हटला की गरमागरम भजी आणि चहा.. पण आमच्या घरी हे असे चिकनचे पॉपकॉन खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर मुसळधार पाऊस आणि गरम-गरम चिकन पॉपकॉर्न त्याची मजा काही औरच आहे. माझी दोन्ही मुलं पाऊस पडला रे पडला की चिकन पटकन बनवण्यासाठी हट्ट करतात. मग काय गरमागरम चिकन पॉपकॉन बनवायचे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1चिकन ब्रेस्ट (बोनलेस क्यूबस)
  2. 2 टेबलस्पूनआले लसून पेस्ट
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट मसाला
  4. 2 टेबलस्पूनचिली सॉस
  5. 2 टेबलस्पूनविनेगर
  6. 1/4 कपदूध
  7. चवीनुसारमीठ
  8. कॉटिंग साठी साहित्य
  9. 1 कपमैदा
  10. 1/2 कपकॉर्नफ्लॉवर
  11. 1/2 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  12. 1अंड
  13. चवीनुसारमीठ
  14. टोमॅटो सॉस सर्विसिंग साठी

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. आता त्या तुकड्यांना आपण मॅरीनेशन करूया त्यासाठी सर्वप्रथम आपण आले-लसूण पेस्ट व मीठ, तिखट, चिकनला व्यवस्थित लावून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये चिली सॉस व विनेगर टाकावा. तेही व्यवस्थित लावून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये दूध टाकावे. त्यानंतर त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण आपल्याला एक तास फ्रिजमध्ये ठेवून द्यायचे आहे.

  2. 2

    एक तासानंतर ते फ्रीजमधून काढावे. त्यानंतर त्यामध्ये एक अंडे फोडून टाकावे. पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. एका भांड्यामध्ये आपल्याला कोटिंग तयार करून घ्यायचे आहे हे ड्राय कोटिंग आहे. त्यासाठी मैदा, कॉर्नफ्लोअर, चिली फ्लेक्स व मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून एका साईटला ठेवून द्यावे.

  3. 3

    त्यानंतर चिकनचे पीस ड्राय मिश्रणामध्ये घोळवून घ्यावे. व एका प्लेटमध्ये काढावे. हे आपण पहिलं कोटिंग केलं आहे आता आपल्याला पुन्हा एक कोटिंग करायचा आहे त्यासाठी मॅरीनेशनचं जे पाणी उरेल. त्यामध्येच थोडंसं साधं पाणी टाकून घ्यायचं व पुन्हा एकदा हे पीठ लावलेले चिकनचे पीस त्या पाण्यामध्ये ओले करायचे. व पुन्हा ड्राय मिश्रणामध्ये हे घोळवून घ्यायचे. त्याला डबल कोटिंग करणे असे म्हणतात.

  4. 4

    तेल गरम करून घ्या. त्यामध्ये हे चिकनचे पीसेस तळून घ्या. हे पीस आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत. व अशाप्रकारे आपले तयार होतील चिकन पॉपकॉन टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

Similar Recipes