खिचडी (khichadi recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#फोटोग्राफी
खिचडी....आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून खिचडीला गौरवलं गेलंय..
तशी खिचडीची ओळख आपल्याला तान्हेपणापासूनच होते..आईच्या दुधानंतर बाळांना तांदूळ आणि मूगडाळीची पेज पाजतात...नंतर काही दिवसांनी त्याचे दाटसर खिमट करुन खायला घालतात..एक घास काऊचा ..एक घास चिऊचा असं म्हणत..तर अशी आपली ओळख खिचडीशी...
आपल्याकडे जेवढी घरं तितके वेगवेगळे खिचडीचे चवदार चविष्ट प्रकार बघायला मिळतात..हर एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,तर काही ठिकाणी भिजवलेले मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. अर्थात आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍
चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली भिजवलेल्या मोड आलेल्या हिरव्या मुगाची कुठलाच तामझाम नसलेली पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपमोड आलेले मूग हिरवे
  3. 2मिरच्या
  4. 1/2 इंचआले
  5. 3-4काळी मिरी
  6. 1दालचिनी तुकडा
  7. 2-3लवंगा
  8. मीठ चवीनुसार
  9. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 1 टीस्पूनजिरे,
  11. चिमुटभरहिंग
  12. 1/2 टीस्पूनमोहरी
  13. 1तमालपत्र
  14. 1 टी स्पूनसाखर
  15. कोथिंबीर सजावटीसाठी

कुकिंग सूचना

20-25मिनीटे
  1. 1

    प्रथम तांदूळ आणि हिरवे मुग व्यवस्थित धुऊन ठेवा.

  2. 2

    आता मध्यम आचेवर कुकर मध्ये साजूक तूप घाला. तूप तापल्यावर त्यात मोहरी जीरं हिंग याची खमंग फोडणी करून घ्या. नंतर मिरच्या तुकडे,आल्याचे तुकडे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, तमालपत्र घालून व्यवस्थित परता.

  3. 3

    भिजवलेले तांदूळ आणि हिरवे मूग या फोडणीवर घाला आणि चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला एक चमचा साखर घाला आणि परत एकदा मिक्स करा. आणि गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या करा.

  4. 4

    कुकरचे झाकण पडल्यावर गरमागरम खिचडी वर साजूक तूप घालून पापडाबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes