सरसरीत पिठलं (pithale recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#रेसिपीबुक #week5 मधली ९ वी रेसिपी आहे या आठवड्यात पावसाळी गंमत अशी थीम आहे. म्हणून मी गरमागरम सरसरीत पिठलं बनवले आणि पावसाळा म्हटलं की गरमागरम झणझणीत स्पायसी खायला पावसाळ्यात मजा येते. छान ज्वारी च्या भाकरी आणि हिरव्या मिरच्या चा ठेचा आणि सोबत च हाताने फोडलेला कांदा मिळाला की आहाहांं.....।।।।। चला तर बघुया💁 सरसरीत गरमागरम पिठलं नक्की करून बघा.....!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ ते ५
  1. 1मोठी वाटी चना दाळीचे बेसन
  2. 2बारीक चिरलेला कांदा
  3. 2बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 10बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या
  5. 6ते ७ कडीपत्ता ची पाने
  6. 1 वाटीबारीक चिरलेली कोशिंबीर
  7. 1 टेबलस्पूनकस्तुरी मेथी
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1 टीस्पूनजिर
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनहळद
  12. चवीनुसारमिठ
  13. तेल फोडणी करीता

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका कढईत तेल घेऊन गरम करून घ्या, जिरं, मोहरी टाकून छान मोहरी तडतडल्यावर

  2. 2

    त्यात कढीपत्त्याची पाने आणि आणि कस्तुरी मेथी टाकून थोडं परतून, या नंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या, नंतर हिंग आणि हळद टाकून शिजवून घ्यावे,

  3. 3

    त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि मीठ टाकून छान टोमॅटो शिजत पर्यंत परतून घ्या सोबतच थोडी कोथिंबीर टाका म्हणजे (पिठल्याला कोशिंबीर टाकल्याने फार छान स्वाद येतो), नंतर बेसन टाकून छान ढवळून घ्या

  4. 4

    बेसनाच्या गुठळ्या न होणार असे एकजीव करून मॅश करून घ्या नंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून चमचम ढवळत राहा म्हणजे आपोआप बेसन घट्ट होते सरसरीत बेसन होण्यासाठी पाणी थोडं जास्त टाका म्हणजे बेसन घट्ट होणार नाही,

  5. 5

    सात ते आठ मिनिट झाकण ठेवून पिठलं शिजवून घ्यावे (झाकून ठेवल्याने बेसनाचा कच्चेपणा निघून जातो), नंतर पिठल्याला असे बबल्स आले की कोशिंबीर टाकून छान चमचा ने मिक्स करून घ्या, आपलं सरसरीत झणझणीत गरमागरम पिठलं 💁तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes