मलाई पेढे (malai pedhe recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

मुलीचा १०वी चा result २९ जूलै ला लागणार कळल्यावर थोडी धडधड वाढू लागली... चांगले मार्क्स तर येणार पण ह्या कोविड-१९ मुळे थोडे टेन्शन पण आले...
माझ्या टेन्शन वरची मात्रा म्हणजे स्वयंपाक घर... झालं तर मग... घेतले पेढे बनवायला...
#पेढे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनीट
15 पेढे
  1. १५० मिली दूध
  2. 1 कप(अंदाजे २०० ग्राम) मिल्क पावडर
  3. वेलची पावडर चविनुसार
  4. 1/3 कपसाखर
  5. 2-3 चमचेतूप

कुकिंग सूचना

20-25 मिनीट
  1. 1

    एका पॅन मध्ये दूध थोडे कोमट करून घ्यावे. त्यात मिल्क पावडर घालावी व सतत ढवळत रहावे. गुठळ्या होऊ देऊ नये.

  2. 2

    दूधाची पावडर व दूध एकजिव झाले की त्यात तूप, साखर व वेलची पावडर घालून एकत्र करावे व हे मिश्रण सतत ढवळत रहावे.

  3. 3

    मिश्रण साईड नी सुटू लागल्यावर एका गोळ्यासारखे तयार होईल.

  4. 4

    हे मिश्रण थंड करत ठेवावे.

  5. 5

    थंड झाल्यावर तूपाचा हात घेऊन छोटे गोळे बनवावे व थोडे चपट करावे. त्यावर पिस्ता किंवाबदाम लावून घरात सर्वांना वाटावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes