मावा पेढा (mawa peda recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#KS6 थीम 6 : जत्रा फूड
रेसिपी २
माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात.
"जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी

मावा पेढा (mawa peda recipe in marathi)

#KS6 थीम 6 : जत्रा फूड
रेसिपी २
माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात.
"जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
  1. 150 ग्रॅममावा
  2. 20 ग्रॅममिल्क पावडर
  3. 3 टेबलस्पूनपिठी साखर
  4. 1 टीस्पून वेलची पावडर

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    पॅन गरम करून मावा भाजून घ्यावा. खूप न भाजता हलकासा कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यावे. जेणेकरून दुधाचा वास राहत नाही. त्यानंतर त्यात मिल्क पावडर ऍड करावी. थोडावेळ परतल्यावर त्यात पिठी साखर मिक्स करावी.

  2. 2

    पिठी साखर मिक्स केल्यावर सतत ढवळत रहावे. साखर व मावा एकजीव व घट्ट झाल्यावर पॅन खाली उतरावे. थंड झाल्यावर त्या गोळ्याचे छोटे गोल करावेत. तयार झाले "पेढे"

  3. 3

    असे पेढे सणाला, किंवा देवाला प्रसाद म्हणून आपण बनवू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या (6)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
खूपच छान... कोल्हापूरमध्ये असलेल्या यळगुड गावच्या दूध
संघात मिळणाऱ्या पेढ्यांसारखे दिसतायत अगदी... 🤤

Similar Recipes