जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)

#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत.
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत 1 मेजरिंग कप जवस घेवून ते चांगले तडतड आवाज येईपर्यंत परतून घेतले. आणि थंड करण्यासाठी एका बाउल मध्ये काढून घेतले. आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.
- 2
मग त्यात 1मेजरिंग कप सुके खोबरे 1 चमचा तूप घालून गुलाबी रंगावर भाजून घेतले. आणि थंड करण्यासाठी एका बाउल मध्ये काढून घेतले. व थंड झाल्यावर वाटून घेतले.
- 3
नंतर त्याच कढईत 1/4 मेजरिंग कप डिंक घालून तो चांगला फुलवून घेतला. आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतला.
- 4
मग त्याच कढईत तूप घालून 10 काजू, 10 बदाम चांगले परतून घेतले. आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवले.
- 5
नंतर त्याच कढईत 1 चमचा तूप घालून, त्यात 1 मेजरिंग कप गव्ह्याचे पीठ घालून ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवले. आणि त्यात 2 चमचे भाजलेले तीळ घालून, ते चांगले मिक्स करून परतून घेतले.
- 6
मग एका कढईत 1 चमचा तूप घालून त्यात 1.5 मेजरिंग कप गूळ घालून, तो चांगला वितळवून घेतला. नंतर त्यात बारीक वाटून घेतलेले जवस, सुके खोबरे,तळून घेतलेला डिंक, छान परतून घेतलेले गव्ह्याचे पिठ आणि 2 चमचे भाजून घेतलेले तीळ घालून घेतले.
- 7
आता सर्व साहित्य एकत्र करून,त्यात सुंठ पावडर, वेलची पावडर घालून ते मिश्रण पुन्हा चांगले मिक्स करून, थोडे थंड झाल्यावर लाडू वळून घेतले.
- 8
आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले पौष्टिक जवसाचे लाडू. हे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू (बीना साखरेचे) (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड खजूर ड्रायफ्रूट पौष्टिक लाडू ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी डिंक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडू आज गोकुळाष्टमी आज खूप पदार्थ करायच ठरले एक कृष्णा साठी फराळच केला म्हणा ना त्यात बनवले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू खूप जणांना आवडतात. आवडणार का नाही ड्राय फ्रूट नी भरपूर उत्तम चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. चला करूया डिंकाचे लाडू. 😀 Veena Suki Bobhate -
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
सुंठ पिपरमुळाचे लाडू (sunthache ladoo recipe in marathi)
#लाडू मला आवडतात म्हणून आई नेहमी माझ्या साठी बनवताना. जास्त करून थंडी मध्ये हे लाडू खातात पण या कोरोना काळात, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच पावसाळ्यात सर्दी खोकला होऊ नये यासाठी हे लाडू खुपच गुणकारी आहेत.हे तिखट-गोड लाडू तुम्हा सर्वांना नक्की आवडतील.पण हा लाडू सकाळी नाश्ता आधी खायचा बर का.....dipal
-
मेथीच्या दाण्याचे लाडू (methidanyache ladoo recipe in marathi)
#GA4 #Week2बराच वेळा बाळंतपणानंतर खायला दिला जाणारा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे.लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला एकदम उपयुक्त असणारा हा लाडू मी माझ्या आईकडून बनवायला शिकले. हे लाडू सांधे दुखी,कंबर दुखी, वाता सारख्या दुखण्यावर रामबाण इलाज आहेत. Shubhangi Dudhal-Pharande -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुळ पोळी (Gulpoli Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी आज मी गुळपोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेंगदाण्याचे लाडू (Shengdana Ladoo Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सुक्या मेव्याचे लाडू (sukhya mevyache laddu recipe in marathi)
थंडीत एकदम पौष्टिक कमी तुपाचे लाडू. Anjita Mahajan -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी माझी पुरणपोळी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
राजगिरा पिठाचे लाडू (rajgira pithache ladoo recipe in marathi)
राजगिर्याला रामदाना असेही म्हणतात. याच्यामध्ये कॅल्शियम ,आयर्न,पोटॅशियम ,प्रोटीन ,अँटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. याच्यामध्ये दुधाच्या दुप्पट कॅल्शियम असते. राजगिर्या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले पाचन तंत्र व्यवस्थित राहते .याच्या सेवनाने कोलेस्टरॉल ची लेव्हल कमी होते .व्हेरिकोज व्हेन्स साठी हा अतिशय लाभदायी आहे तसेच वेटलॉस होण्यासही राजगिरा अतिशय उपयुक्त आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी.. Ashwini Anant Randive -
सुकामेवा चे डिंकाचे लाडू (sukhamewache dinkache ladoo recipe in marathi)
#MS हे लाडू खरे तर गरोदर महिलांना खाण्यासाठी केले जातात तसेच लहान मुलांना पण खुप उपयुक्त आहेत.डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व डिंकामध्ये असतात. आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींसाठीही डिंक फायदेशीर ठरतो. Gauri Chavan -
रव्याचे लाडू (Ravyache Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी रव्याचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पंचखाद्य लाडू (Panchkhadya Ladoo Recipe In Marathi)
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माझी आई पंचखाद्य लाडू बनवायची. ते लाडू मी आज श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure
More Recipes
- शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पानाची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
- फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
- कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
टिप्पण्या