दुध लाडू (doodh ladoo recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#पिठोरी
श्रावण अमावास्या, अर्थात पिठोरी, आपला मातृदिन आणि आपला बैल पोळा देखील. हे सर्व आपले उत्सव आहेत, कारण आपली नाळ शेतीशी आणि मातीशी जुळलेली आहे. आपण मातीला आई मानतो म्हणुन आपला स्वभाव झाडांसारखा. आभाळभर वाढल्यावर वडाच्या पारंब्यांनी पुन्हा मातीकडे वळावे तसा. आपण पुन्हा पुन्हा आपल्या इतिहासातून समृद्ध परंपरांना ढुंडाळत राहतो.
आपली संस्कृती ही सर्वव्यापी आहे, आपली पाक-कला त्यापासून वेगळी कशी असेल. नव्या ग्लॅमरस रेसिपींच्या भाऊगर्दीत हरवत चाललेली ही एक सदाबहार रेसिपी. आपल्या पैकी अनेकांना जुन्या काळाची आठवण करून देणारी. काहींना नव्याने खुणावणारी, 'दुध लाडू' (यातील दुध हा शब्द नारळाचे दुध या अर्थाने आला आहे). आमच्या भागात पुर्वी पिठोरीच्या पुजेला हा नैवेद्य दाखवला जाई. माझ्या आजे-सासूबाईंच्या मावशीने, सासूबाईंना आणि आणि आजेसासुबाईंना खाऊ घातलेले, पारंपारिक जिन्नस आणि पारंपारिक कृतीने बनणारे हे दुध लाडू. आपण सर्वांनी मिळून या रेसिपीज जतन करू, म्हणजे पुढच्या पिढ्यांना तो ठेवा मिळू शकेल..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५-५० मिनिटे
8-9 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदुळाचा रवा (इडली रव्यापेक्षा थोडा बारीक)
  2. 1 कपनारळाचे दुध
  3. 3/४ कप गूळ
  4. 1/2 कपकिसलेला ओला नारळ
  5. 1 टीस्पूनवेलची पूड
  6. 1 (1/4 कप)पाणी
  7. 2 टीस्पूनतूप
  8. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

४५-५० मिनिटे
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता एका टोपात पाणी घ्यावे. (पाणी नेहमीप्रमाणे समप्रमाणात ना घेता थोडे जास्त घ्यावे.) त्यात २ टीस्पून तूप व चवीनुसार मीठ घालावे. पाणी व्यवस्थित उकळल्यावर त्यात तांदळाचा रवा आणि किसलेला नारळ घालून उकड काढून घ्यावी. (५-१० मिनिटे झाकण ठेवून द्यावे.)

  2. 2

    तयार उकड एका ताटात काढून त्याला थोडा पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यावे. आता त्याचे लाडू वळून घ्यावेत. तयार लाडू साधारणतः १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावेत.

  3. 3

    दुसरीकडे एका टोपात थोडेसे पाणी घेऊन त्यात गूळ विरघळवायला ठेवावा. गूळ विरघळल्यानंतर गॅस बंद करावा. आणि ५ मिनिटानंतर त्यात नारळाचे दुध घालावे. नीट एकजीव झाल्यानंतर त्यात वाफवलेले लाडू सोडावेत.

  4. 4

    १०-१२ मिनिटे लाडू गूळ-दुधाच्या मिश्रणात शिजू द्यावेत. गरमागरम दुध लाडू तय्यार!!!
    सर्व करताना त्यावर साजूक तूप घालावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes