व्हीट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
Kalyan West.

#noovenbaking मैद्याला बाजूला ठेवून कणकेचा पौष्टिक आणि सोप्पा केक शिकवल्याबद्दल शेफ नेहा ह्यांचे खूप आभार.
मी केक याआधी केला आहे पण अगदी बेसिक, फ्रॉस्टिंग आइसिन्ग ह्या गोंष्टींचा श्री गणेशा ह्या केक पासून मला करता आला.
Thank you ....

व्हीट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking मैद्याला बाजूला ठेवून कणकेचा पौष्टिक आणि सोप्पा केक शिकवल्याबद्दल शेफ नेहा ह्यांचे खूप आभार.
मी केक याआधी केला आहे पण अगदी बेसिक, फ्रॉस्टिंग आइसिन्ग ह्या गोंष्टींचा श्री गणेशा ह्या केक पासून मला करता आला.
Thank you ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. केक बेस साठी :
  2. 3/4 कपगव्हाचे पीठ
  3. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. चिमूटभरमीठ
  6. 100 ग्रॅमपिठी साखर
  7. 1/2 कपपाणी
  8. 1 टीस्पूनकॉफी पावडर
  9. 2 टीस्पूनव्हिनेगर
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनवॅनिला एसेन्स
  12. फ्रॉस्टिंग साठी
  13. 1/2 कपमिल्क कंपाउंड चॉकोलेट
  14. 1/2 कपडार्क कंपाउंड चॉकोलेट
  15. फ्रेश क्रीम
  16. 1/4 कपबदाम आणि अक्रोडचे तुकडे डेकोरेशन साठी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम केक मोल्ड ला बटर लावून खाली बटर पेपर घालावा. बटर पेपर नसल्यास थोडेसे गव्हाचे पीठ भुरभुरून घ्यावे, ज्यामुळे केक खाली लागणार नाही.

  2. 2

    एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, कोको पावडर, बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ आणि पिठी साखर एकत्र चाळून घ्यावे. (चाळून घेतल्याने जाडसर कण बाजूला राहतात.)

  3. 3

    नंतर दुसऱ्या बाउल मध्ये पाणी घेऊन त्यात कॉफी पावडर, तेल, व्हिनेगर, आणि वॅनिला एसेन्स एकत्र करून घ्या.

  4. 4

    एका कढई मध्ये खाली मीठ पसरवून त्यात जाळी / स्टॅन्ड ठेवून ५-१० मिनिटे गरम करून घ्यावी.(pre-heat)

  5. 5

    आता पाणी कॉफी च्या मिश्रणात वरील कोरडे मिश्रण घालून एकत्र करून घ्यावे. तयार मिश्रण केक टिन मध्ये काढून घ्यावे. आणि गरम करून घेतलेल्या कढई मध्ये केक बेक करायला ठेवून द्यावा. मोठ्या आचेवर १० मिनिटे आणि माध्यम आचेवर २०-२५ मिनिटे केक बेक करून घ्यावा.केक बेक करून झाला कि १०मिनिटांनी मोल्ड मधून काढून घ्यावा आणि थंड होऊ द्यावा.
    केक थंड होईपर्यंत फ्रॉस्टिंग तयार करून घेऊ.

  6. 6

    Double boiling पद्धतीने चॉकोलेट वितळवून घ्यावे मग त्यात क्रीम घालून केक साठीचे क्रीम\
    तयार करून piping bag मध्ये भरून घ्या. मी इथे लाईट आणि डार्क असे दोन चॉकोलेट वापरले आहे त्यामुळे वेगळे कलर मिळतील.

  7. 7

    तयार केक च्या बेस ला डार्क चॉकोलेट फ्रॉस्टींग टाकून घ्या. मग piping bag मध्ये घेतलेले लाईट चोकोलेटने डेकोरेशन करूया. मी डेकोरेशन साठी बदाम आणि अक्रोड चे तुकडे वापरले आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
रोजी
Kalyan West.

टिप्पण्या

Similar Recipes