चटपटीत काॕर्न चाट (corn chaat recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

मंडळी, पावसाळी वातावरणात संध्याकाळचे वेळी काहीतरी चटपटीत मसालेदार खाण्याची इच्छा होते सगळ्यांची...आणि मग रोज काय बनवावे हा प्रश्न पडतो. अशावेळी मुबलक उपलब्ध असलेला मका आपल्या मदतीला येतो. मग कधी त्याचे वडे, तर कधी त्याचा उपमा होतो. मी मात्र आज मक्याच्या दाण्यांचे चटपटीत चटकदार चाट बनवले आहे. करायला अगदी सोपे, आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात झालेय.....तर बघू या......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मक्याच्या कणसाचे दाणे
  2. 1मध्यम कांदा आणि टोमॅटो,
  3. 2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे,
  4. चिरलेली थोडीशी कोथिंबीर,
  5. आवश्यकतेनुसार तिखट,
  6. 2 टेबलस्पूनशेव,
  7. 1 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  8. आवश्यकतेनुसार मीठ,
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. आवश्यकतेनुसार चाटमसाला
  11. 1लिंबू
  12. चाट

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरुन घ्यावी. नंतर मक्याचे दाणे, किंचित पाणी टाकून वाफवून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर दाणे एका भांड्यात काढून घेऊन त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, तिखट, मीठ, चाटमसाला टाकून एकञ करावे.

  3. 3

    त्यानंतर त्यात शेव कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि वरुन लिंबाचा रस पिळून पून्हा एकञ करावे. आवडत असेल तर चिमूटभर साखर टाकावी.झाले आपले चमचमीत चटकदार काॕर्न चाट तयार....

  4. 4

    चला तर मग हे गरमागरम चाट आपली वाट पहातेय...... एक मात्र लक्षात ठेवायचे की मक्याचे दाणे गरमागरम च खायचे!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes