महाराष्ट्रीयन बरितो बाऊल (Maharashtrian Burrito Bowl Recipe In Marathhi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#रेसिपीबुक #week9

Cookpad चा या फ्युजन थीम मुळे मला पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह ट्राय करायला मिळाले, मला तसा जास्त वेळ नव्हता काही कामामुळे पण मला ही फ्युजन थीम चुकवायचा नव्हती म्हणून वेळात वेळ काढून ही महाराष्ट्रीयन बरीतो बाउल बनवले. तसे मला या डिश बद्दल फारशी माहिती नव्हती असाही म्हणत येईल की मला हे नाव पण माहिती नव्हतं, cookpad च्या या प्लॅटफॉर्म मुळे यांच्या सुचवलेल्या छान छान थीम मुळे बऱ्याच नवनवीन दिशेस ची मला माहिती मिळाली आणि मला नवनवीन पदार्थ बनवायला फार आवडतं.
फ्युजन थीम मध्ये मी महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय मसालेभात आणि मॅक्सिकॅन बीन्स हे दोन्ही मिळवून ही डिश बनवली आहे. मसालेभात हा आपल्या महाराष्ट्रात लग्नात, पंगतीत आणखी देवाच्या भंडारा लाही नेहमी केला जातो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. मसालेभात साठी
  2. 1 कपबासमती तांदुळ
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 2हिरवी मिरची
  6. 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  7. 2 कपफुलकोबी, बटाटा, बीन्स, मटार
  8. 2-3 इंचदालचिनी
  9. 1तमालपत्र
  10. 1लवंग
  11. 1वेलची
  12. 4-5काळीमिरी
  13. 1 टीस्पूनजिर मोहरी
  14. 1टिस्पून हळद
  15. 1 टेबलस्पूनतिखट
  16. 1 टेबलस्पूनधणेपूड
  17. 1 टीस्पूनगरम मसाला
  18. चवीपुरते मीठ
  19. मॅक्सिकन बीन साठी
  20. 1 कपराजमा भिजवून उकडलेले
  21. 1कांदा बारीक चिरलेला
  22. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  23. 1 टेबलस्पूनटोमॅटो कॅचप
  24. 1 टेबलस्पूनतिखट
  25. चवीपुरते मीठ
  26. सालसा साठी
  27. 1टोमॅटो
  28. 1कांदा
  29. 3हिरवी मिरची
  30. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  31. 1 टीस्पूनओरेगानो
  32. चवीपुरते मीठ
  33. दही साठी
  34. 1/4 कपचक्का दही
  35. 2 टेबलस्पूनजिरेपूड
  36. चवीपुरते मीठ
  37. सजावटीसाठी
  38. आवडीनुसारचीज
  39. आवडीनुसारनाचोस
  40. आवडीनुसारकांदापात

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    मसालेभात साठी- बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून 15 मिनिट भिजत ठेवा. त्यानंतर एका भांड्यात तेल घालून त्यात सर्व मसाले घाला, त्यानंतर कांदा आणि मिरची घालुन परतून घ्या.

  2. 2

    त्यानंतर त्यात भाजी घालून 5 मिनिट झाकून शिजवून घ्या. मग त्यात आल लसूण पेस्ट आणि तिखट, हळद, मीठ, धणेपूड गरम मसाला घालून 2 मिनिट शिजवून घ्या.

  3. 3

    त्यानंतर त्यात टोमॅटो आणि तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करा, आता त्यात पाणी घालून 15 मिनिट शिजवून घ्या.

  4. 4

    मॅक्सिकन बीन साठी- एका भांड्यात तेल घ्या त्यात कांदे घाला कांदे थोडे शिजले की त्यात टोमॅटो घाला, मग त्यात टोमॅटो कॅचप घाला व 2 मिनिट शिजवून घ्या.

  5. 5

    त्यानंतर त्यात राजमा घाला, मग त्यात तिखट, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा व 2 मिनिट शिजवा, त्यानंतर पाणी घाला व 5 मिनिट झाकून शिजवून घ्या.

  6. 6

    सालसासाठी- टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, ओरेगानो, मीठ घालून मिक्स करा आणि चमच्याने त्याला थोड दाबून घ्या.

  7. 7

    दही साठी - दहीमध्ये मीठ आणि जिरेपूड घालुन चमच्याने 2 मिनिट फेटून घ्या.

  8. 8

    महाराष्ट्रीयन मॅक्सिकन बाउल तयार करण्यासाठी - आधी अर्ध्या बाउल मध्ये मसाले भात घालून चमच्याने प्लेन करून घ्या. मग त्यावर मॅक्सिकन बीन ची लेयर घाला.

  9. 9

    त्यानंतर दहीची लेयार लावा, त्यानंतर सालसा घाला.

  10. 10

    आता त्यावर चीज किसून घ्या मग त्यावर कांद्याची पात आणि त्यावर नाचोस चे बारीक तुकडे घाला आणि आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

Similar Recipes