आचारी आलू (aachari aloo recipe in marathi)

Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
Kalyan West.

#बटाटा
#झटपट भाजी
भाजी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो आपल्यासमोर. घरात काही भाजी नसेल आणि पटकन कुठली भाजी करायची हा प्रश्न "आचारी आलू" नक्की सोडवेल. करायला सोप्पी, पटकन होणारी आणि चटपटीत अशी ही भाजी . "आचारी आलू".

आचारी आलू (aachari aloo recipe in marathi)

#बटाटा
#झटपट भाजी
भाजी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो आपल्यासमोर. घरात काही भाजी नसेल आणि पटकन कुठली भाजी करायची हा प्रश्न "आचारी आलू" नक्की सोडवेल. करायला सोप्पी, पटकन होणारी आणि चटपटीत अशी ही भाजी . "आचारी आलू".

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
५-६
  1. १४-१५ छोटे बटाटे (baby potato)
  2. 1/4 टीस्पूनमोहोरी
  3. 1/4 टीस्पूनजिरं
  4. 1/2 टीस्पूनबडीशेप
  5. 4-5मेथी दाणे
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनधणे पावडर
  8. 1/4 टीस्पूनजिरं पावडर
  9. 2मिरच्या बारीक चिरून
  10. १.५ टेबलस्पून तिखट
  11. कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    लहान बटाटे (baby potato) उकडून सालं काढून त्याला काटा चमच्याचे टोचे मारून घ्या. २मिरच्या बारीक तुकडे करून घ्या. (मोठे बटाटे उकडून त्याच्या फोडी वापरून सुद्धा करू शकता).

  2. 2

    एका कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल तापले की त्यात मोहोरी, जिरं, मेथी दाणे, बडीशेप घालून फोडणी करा. फोडणी तडतडली की त्यात मिरच्यांचे तुकडे, हळद आणि हिंग घालून नीट एकत्र करून घ्या.

  3. 3

    फोडणी झाली की त्यात उकडलेले बटाटे घालून एकत्र करा. मग तिखट, धणे पूड, जिरं पूड चवी प्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून एकत्र करून नीट मिक्स करून घ्या जेणेकरून मधला सगळ्या बटाट्याना नीट लागेल.

  4. 4

    आता झाकण देऊन २-५ मिनिटे वाफ काढून घ्या. गरमा गरम आचारी आलू खायला तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
रोजी
Kalyan West.

टिप्पण्या

Similar Recipes