पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
6-7 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीडोशाचे पीठ
  2. 1 वाटीभिजवलेले पोहे
  3. 1 चमचामीठ
  4. 2छोटे बारीक चिरलेले कांदे
  5. 2बारीक मिरच्या
  6. 4ते पाच चमचे तेल
  7. 1 इंचआलं
  8. 1मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1 वाटीखोवून घेतलेला नारळ
  10. 3 चमचेफुटाणे
  11. 1/2 चमचाहिंग फोडणी करिता
  12. 1देठ कढीपत्ता
  13. 1/2 चमचामोहरी
  14. 1 चमचाजिरे

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    आप्पे बनविण्याकरिता 2 ग्लास तांदूळ व एक ग्लास उडीद डाळ या प्रमाणात रात्रभर भिजवून ठेवावे. पाच ते सहा तास भिजून झाल्यावर त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटावे.

  2. 2

    सात ते आठ तास आंबत ठेवावे. मिश्रण नीट आंबले आहे हे चेक करण्यासाठी भांड्या अर्ध्यापर्यंत आंबलेले दिसेल.

  3. 3

    हवे आहे तेवढे मिश्रण बाजूला घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आले, कोथिंबीर, मीठ घालून दहा ते पंधरा मिनिटात बाजूला ठेवावे. असे केल्याने सगळ्या जिनसांचा इसेन्स त्यात उतरतो.

  4. 4

    15 ते 20 मिनिटे पोहे भिजत ठेवावे, पोहे पूर्णपणे भिजल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकेसे पाणी घालून वाटून घ्यावे.

  5. 5

    पोहे घातल्यामुळे ते अगदी कुरकुरीत आणि मध्यभागी माऊ लागतात.

  6. 6

    बनवलेले पोह्याचे मिश्रण डोसाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यावे. एक वेगळी देण्याकरिता ठेचा ऍड करू शकता.

  7. 7

    पात्राला थोडेसे तेलाने ग्रीस करून त्यामध्ये आप्पे चे बेटर भरून घ्यावे व झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शिजवावे. गॅस सिम वर असावा याची खात्री करून घ्यावे. त्याने आप्पे कुरकुरीत होतात. व रंगही अतिशय सुरेख येतो.

  8. 8

    चटणी बनवण्याकरिता नारळ, आले, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जीरा, मीठ, फुटाणे एकत्र मिक्सर च्या भांड्याला लावून बारीक पेस्ट करून घ्यावे.

  9. 9

    तोपर्यंत गॅसवर फोडणी देण्याकरिता छोट्या कढईमध्ये तेल, मोहरी, ताडताड होय पर्यंत गरम होऊ द्यावे,. हिंग,कश्मीरी चिल्ली पोवडर, हळद टाकून गॅस बंद करून घ्यावे. त्यामध्ये बनवलेले वाटण टाकुन निट एकजीव करून घ्यावे. आप्पे बरोबर चटपटीत चटणी खायला रेडी.

  10. 10

    गरमागरम पोह्याचे आप्पे विथ कोकोनट चटणी रेडी टू इट. एकदम झकास.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes