पोह्याचे कटलेट्स

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपपोहे
  2. 1/2बीट किसलेला
  3. 1कांदा बारीक चिरलेला
  4. 3मिडीयम साईझ बटाटे उखडून मॅश केलेले
  5. 3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  6. 2 टीस्पूनमिरची पावडर
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  9. 1 टीस्पूनचाट मसाला
  10. मीठ चवी नुसार
  11. तेल तळण्यासाठी
  12. कॉर्नफ्लेक्स चा चुरा
  13. रवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात पोहे भिजवून घ्यावे.

  2. 2

    आता एका भांड्यात भिजलेले पोहे, मॅश केलेला बटाटा, किसलेला बीट, कांदा, कोथिंबीर, आमचूर पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, मीठ घालून एकजीव करून घ्यावं.

  3. 3

    आता ह्या मिश्रणाचे हवे त्या आकाराचे कटलेट बनवून घ्यावे.

  4. 4

    आता अर्धे कटलेट कॉर्नफ्लेक्स च्या चुऱ्यात आणि अर्धे रव्यात घोळवून घ्यावे.(आवडीनुसार)

  5. 5

    आता कढईत तेल गरम करून हे कटलेट छान क्रिस्पी होई पर्यंत तळून घ्यावे.

  6. 6

    पोह्याचे कटलेट तयार आहेत हे चटनी किंवा सॉस बरोबर सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes