ब्रेड- मावा आप्पे (bread mawa appe recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#रेसिपीबुक #week11
पारंपारिक आप्पे म्हटले म्हणजे रवा ,तांदूळ गुळ ,केळ असे पदार्थ वापरून आप्पे केले जातात. आमच्याकडेही याच प्रकारे गोडाचे आप्पे केले जातात पण आज काहीतरी हटके करावं असा विचार करून ब्रेडच्या स्लाईस वापरून आप्पे बनवले आणि काय सांगू इतके सुंदर खुसखुशीत चवदार आप्पे झाले की घरातले सर्वजण एकदम खुश. एक वेगळा फ्लेवर म्हणून मी आत माव्याचा वापर केला आणि त्यामुळे अजूनच छान चव आली. हे आप्पे करायलाही एकदम सोपे आणि पटकन होणारे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 4ब्रेड स्लाइस
  2. 1/4 कपरवा
  3. 1/2 कपहून थोडी कमी ब्राऊन शुगर(साधी साखर किंवा गूळ)
  4. 1/4 कपमावा
  5. 1/2 कपदूध
  6. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. चिमुटभरखाण्याचा सोडा
  8. चिमुटभरमीठ
  9. केशर इसेन्स किंवा वेलची पावडर
  10. तुकडेकाजू बदाम
  11. 2-3 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधून बारीक करून घ्या एका भांड्यात हा ब्रेडचा चुरा घेऊन त्यामध्ये रवा, ब्राऊन शुगर(तुम्ही साधी साखर किंवा गूळ ही वापरू शकता) किसलेला मावा, काजू बदाम तुकडे हे सर्व घालून नीट मिक्स करून घ्या. एका बाजूला गॅस वर आप्पे पात्र गरम करायला ठेवा.

  2. 2

    आता त्या मिश्रणामध्ये एक टेबलस्पून तूप आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून नीट मिक्स करून घ्या त्यामध्ये अर्धा कप दूध घालून मिश्रण एकजीव करा. गॅस वर ठेवलेल्या आप्पे पात्रमध्ये एक एक थेंब तूप घालून नंतर चमच्याने तयार केलेले मिश्रण घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर चार ते पाच मिनिटे शिजू द्या.

  3. 3

    आता त्यांच्या वरच्या बाजूला एकेक थेंब तुपाचा सोडून ते उलट करा आणि चार ते पाच मिनिटात परत शिजू द्या. ब्रेड असल्यामुळे हे आप्पे व्हायला फारसा वेळ लागत नाही. हे आप्पे खायला छान कुरकुरीत आणि खमंग लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes