पौष्टिक चॉकलेट चोको चिप्स पॅनकेक (chocolate choco chips pancake recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#पॅनकेक

ही रेसिपी मुलांना आवडणारी आहे. त्यात गव्हाचे पीठ असल्यामुळे ती पौष्टीक पण आहे.

पौष्टिक चॉकलेट चोको चिप्स पॅनकेक (chocolate choco chips pancake recipe in marathi)

#पॅनकेक

ही रेसिपी मुलांना आवडणारी आहे. त्यात गव्हाचे पीठ असल्यामुळे ती पौष्टीक पण आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1आणि 1/2 कप गव्हाचे पीठ
  2. 1आणि 1/2 कप दूध
  3. 1/2 कपपिठी साखर
  4. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  5. 1 टिस्पून बेकिंग पावडर
  6. 1/2 टिस्पून बेकिंग सोडा
  7. 1 टिस्पून व्हॅनिला इसेन्स
  8. 2 टेबलस्पूनवितळलेले बटर
  9. आवडीनुसार चोको चिप्स
  10. चिमूटभर मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम एका बाऊल मध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर चिमुटभर मीठ घालावे.

  2. 2

    दुधात वितळलेले बटर घालून चांगले मिक्स करून घ्यावे. गव्हाच्या पीठाच्या मिश्रणात. वॅनिला इसेंस घालावा. हळूहळू दुधाचे मिश्रण घालून पीठ पातळसर तयार करून घ्यावे. त्यामधे चोको चिप्स घालावे.जर पीठ घट्ट वाटले तर अजून दूध घालून पीठ डोश्याच्या पीठासारखे पातळ करून घ्यावे.

  3. 3

    तवा गॅस वर ठेवून तापवून घ्यावा. त्यावर बटर घालून तयार पीठाचे पॅन केक्स करून घ्यावे. पॅन केक्स मंद आचेवर भाजून घ्यावे.

  4. 4

    पॅन केक्स सर्व्ह करताना त्यावर चॉकलेट सिरप चोको चिप्स घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes