चोको वॉलनट पॅनकेक (choco walnut pancake recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#पॅनकेक
पॅनकेक हा पाश्र्चात्य संस्कृतीतील breakfast मधील अविभाज्य मेंबर..साधारण पणे मैदा,अंडी,फळं यापासून बनवला जाणारा पदार्थ..म्हणजे चवीला केकच्या आसपास जाणारा हा पदार्थ..फक्त बेक न करता pan मध्ये बटरवर किंवा तेलावर केला जाणारा गोल आकाराचा, जास्त raise न होणारा पदार्थ..एवढंच काय ते माझं ज्ञान होतं या pancake बद्दल..हा प्रकार म्हणजे आपली गोडातिखटाची वेगवेगळी combination करुन केलेली धिरडी,घावनं,झालंच तर उत्तप्पा,मिनीडोसा या चा जुळा भाऊच म्हणा ना
तर असा हा आपला दमदमीत नाश्त्याचे पदार्थ करायचे सोडून pancakeच्या वाटेला जायचं असं कधी मनात पण आलं नव्हतं..
पण या आठवड्याची थिम जाहीर झाली तेव्हाच ठरवलं की अरे, ही तर आपल्याला आयती संधी चालून आलेली आहे..त्यामुळे जरा एक दिवस आपला विचार बदलूया म्हणजे माझ्या किचनमधील एका सकाळच्या breakfast च जग बदलेल..म्हणतात ना तुमचा विचार बदला ...की जग बदलेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनीटे
8-9 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 11/2 टेबलस्पूनकोको पावडर
  3. 2 टेबलस्पूनमेल्टेड बटर
  4. 4 टीस्पूनपिठीसाखर
  5. 1 कपदूध
  6. 3-4 टेबलस्पून ताक
  7. 1/2 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  8. 1/2 टीस्पूनचॉकलेट फ्लेवर
  9. 2 टीस्पूनचॉकलेट सॉस
  10. 1/4 कपअक्रोड
  11. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  12. 1 आणि 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  13. चिमुटभर मीठ

कुकिंग सूचना

30-40 मिनीटे
  1. 1

    प्रथम अक्रोड मिक्सरमधून रवाळ दळून घ्या

  2. 2

    आता एका वाडग्यामध्ये चाळणीने मैदा,कोको पावडर, पिठीसाखर,मीठ,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या त्यात अक्रोड पूड घालून हे कोरडे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

  3. 3

    आता या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, चॉकलेट फ्लेवर,वितळलेले बटर,ताक,दूध घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.. गुठळ्या राहता कामा नयेत.

  4. 4

    आता पॅनमध्ये थोडं बटर घालून डावाने वरील मिश्रणाचे छोटे छोटे पॅन केक घाला आणि दोन्ही बाजूने चांगले शिजवून घ्या. अशा रीतीने सगळे पॅन केक करून घ्या

  5. 5

    आता एका डिश मध्ये एकेक पॅन केक ठेवा.प्रत्येक पॅन केकवर थोडं चॉकलेट सॉस drizzle करा.. नंतर अक्रोड टुटी फ्रुटी आणि परत चॉकलेट सॉस drizzle करून सजावट करा.

  6. 6

    अशाप्रकारे आपला चोको वॉल नट पॅन केक खाण्यासाठी तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Similar Recipes