चणा कांद्याची कचोरी (chana kanda kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 फरसाण वाल्या कडे गेले कि एखादी कचोरी दिसली कि मग ती नक्की घेतली जाणार. असा हा माझा एकदम आवडीचा पदार्थ
चणा कांद्याची कचोरी (chana kanda kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 फरसाण वाल्या कडे गेले कि एखादी कचोरी दिसली कि मग ती नक्की घेतली जाणार. असा हा माझा एकदम आवडीचा पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ ४-५ तास पाण्यात भिजवावी. मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावी
- 2
कांदा बारीक कापून घ्यावा. एका पॅनमध्ये १ चमचा तेल घालून त्यात बडीशेप, जिरे घालून फोडणी करावी. कापलेला कांदा भाजून घ्यावा. त्यात वाटलेली चणा डाळ घालून परतून घ्यावे.लाल तिखट, मीठ, हळद घालून कांदा व डाळीचे मिश्रण परतून घ्यावे. शेवटी कोथिंबीर घालून मिसळावे. मिश्रण थंड होऊ द्यावे.
- 3
गहूचे पीठ, मीठ, तेल घालून पीठ मिसळून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी वापरून पीठ मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.
- 4
पीठा चा गोळा घेऊन त्याची वाटी बनवावी. त्यात कांदा चण्याचे मिश्रण घालून गोळा बंद करावा. हाताने चपटे करून कचोरी बनवावी.
- 5
कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. मंद आचेवर कचोरी तळून घ्यावे दोन्ही बाजूइन होईपर्यंत खरपूस तळावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणि कचोरी रेसिपीज#पोस्ट 2आम्ही एकदा शेगाव ला गेलो होतो त्यावेळी आम्ही सुप्रसिद्ध शेगाव कचोरी खाली. भरपूर बडीशेप व डाळ घालून केलेली कचोरी माझ्या मनात अगदी घर करून बसलीय. पण जेव्हा रेसिपी थीम समजली तेव्हा मी ठरवले की मी एक टिकाऊ फरसाण पासून वेगळीच कचोरी करून दाखवायची.मग लागले कामाला. आणि अतिशय टेस्टी व टिकाऊ कचोरी बनवली मी. Shubhangi Ghalsasi -
-
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.Pradnya Purandare
-
-
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
-
मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
#डाळ#रेसिपीबुक#week12#बाकरवडी#कचोरी Yadnya Desai -
खोबऱ्याची कचोरी (khobryachi kacori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12खोबऱ्याचे सारण बनवून कचोरी बनवली रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
बेक कचोरी (baked kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#कचोरीकचोरी म्हंटला डिफ्राय केलेल्या कचोऱ्या समोर येतात आजकाल कोणीही तळकट खाण्याच टाळतात पण कचोरी तर आवडते मग काय एक मस्त प्रयोग केला कचोरी तेलात तळून न घेता बेक करून घेतली कचोरीच फिलिंग आल खाण्याच समाधान झालं. Deepali dake Kulkarni -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
चणाडाळ कचोरी (Chana Dal Kachori Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मी आज चणाडाळ कचोरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मीनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीआज मी घरी असलेल्या साहित्यातून कचोरी बनवायची ठरवली, आणि काय सांगू इतकी अप्रतिम चव आली आहे..... तुम्हीही बघा करून Deepa Gad -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12विदर्भातील श्री संत गजानन महाराजांचे शेगावं म्हणून या संतनगरीची प्रचिती सातासमुद्रापार आहे. याशिवाय विदर्भाची पंढरी म्हणूनही शेगावची ओळख आहे. पण अजूनही एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे शेगावचं नाव आवर्जून घेतलं जातं..!..आणि ती म्हणजे "शेगाव कचोरी". आकाराने छोटीसी पण चव मात्र उत्कृष्ट आणि..लाजवाब स्मिता जाधव -
-
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरीकचोरी म्हटलं कि ती उपवासाची असो किंवा साधीच सगळ्यांच्या आवडीची. कचोरी मध्ये वेगवगळे सारण भरून बनविली जाते कधी आंबटगोड,कढी कांदा, बटाटा, डाळी, पनीर, ड्राय फ्रुटस, खोबरं असे वेगवेगळे सारण घालून बनविली जाते,दही चटणी, शेव सोबत सर्व्ह केली जाते तर उपवासाची दही बरोबर उपवासाच्या पदार्थां बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात उपवासाची कचोरी. Shilpa Wani -
फुटाण्याची कचोरी (futanyachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी #post 1कचोरी मी नेहमीच बनवते, पण फुटायची कचोरी मी पहिल्यांदाच बनवली. काही तरी वेगळ ट्राय कराव म्हणून मी ही कचोरी बनवली. आणि कचोरी खूप छान झाली. Vrunda Shende -
-
मिनी कचोरी / फरसणातील मुगडाळ मिनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीकचोरी कोणाला आवडत नाही असे फार कमी मिळतील. आजची आपली फरसनातील मिनी कचोरी हितर आपली पिकनिक किंवा प्रवासाची जोडीदार चवीला खूप छान लागते. पहिल्यांदा प्रयत्न केला बनविण्याचा आणि खूप छान यश आलं खुश खुशीत झाली आहे मस्त. Jyoti Kinkar -
-
डिस्को कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week12 डिस्को_कचोरी माझा आवडता पदार्थ डिस्को कचोरी मस्त आंबट आणि गोड असा लागणार आणि जास्त दिवस टिकणारा. ही कचोरी 10 दिवस आरामत टिकते, किटी किंवा बर्थडे पार्टी साठी अगदी सोपा असा पदार्थ आहे. आता रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 ह्या आठवड्यात कचोरी थीम होती पण मी आधी पण एकदा कचोरी रेसिपी पोस्ट केली होती मग काय करायचं कळत नव्हतं आज संकष्टी चतुर्थी होती मग लक्षात आलं उपवास कचोरी करूया.. Mansi Patwari -
-
-
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
ब्राऊन ब्रेड कचोरी (brown bread kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#कचोरी मी ही कचोरी तयार करण्यासाठी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. तसेच ब्रेडक्रम्स लावल्यामुळे ही कचोरी मस्तक रेसिपी लागते. तेव्हा नक्की करून बघा. 🥰 Shweta Amle -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 post2 कचोरीउपवासाची कचोरीउपवासाची बाह्रेऊन कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी कचोरी मी केलेली आहे. मस्त पर्याय आहे उपवासासाठी. नक्की करून बघा Monal Bhoyar -
More Recipes
टिप्पण्या