व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#मोमोज #सप्टेंबर

खरे तर मोमोज म्हटले की मी कधी त्याकडे पाहिलेच नाही आतापर्यंत . असे वाटायचं की हे फक्त व्हेज रहात असावं . त्यामुळे कधी खाण्याचा प्रश्नच आला नाही. मग करणे तर दूरच..पण यावेळी असलेल्या रेसिपी आधी रेसिपीची शोधाशोध झाली. आणि नंतर ते बनविण्याचा घाट घातला..घाट यासाठी म्हणतेय , जोपर्यंत करीत नाही, तोपर्यंत ते कठीणच वाटणार..त्यामुळे अगदी बेसिक म्हटले तरी चालेल , पण प्रयत्न करुन पाहिलाय..निदान पाहून तरी तो कितपत जमलाय बघू..अगदी थोडेच केलेय...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 मेजरींग कप कणीक
  2. 1/2 मेजरींग कप मैदा
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1आणि 1/2 टेबलस्पूनतेल मोहन
  5. 1/2 मेजरींग कप पानकोबीचा कीस सारणासाठी
  6. 1/2 मेजरींग कप गाजराचा कीस
  7. 2 टेबलस्पूनसिमला मिरची बारीक चिरलेली
  8. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन
  9. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरुन
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. चवीनुसार मीठ
  14. 1/2 टीस्पूनमिरेपुड
  15. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30-40 मिनीट
  1. 1

    प्रथम पारीकरिता कणीक भिजवून घेऊ. कणीक आणि मैदा चाळून घ्यावे. नंतर त्यात मीठ आणि तेल टाकावे. कणीकेला तेल चांगले चोळून घेऊन थोडे थोडे पाणी टाकून नरम भिजवून घ्यावे. भिजवलेली कणीक 30 मिनीटे झाकून बाजूला ठेवावे.

  2. 2

    आता सारणाकरिता कढई गॅस गरम करायला ठेवा. तेल टाकून गरम झाल्यावर जिरे टाकून तडतडल्यावर चिरलेली हिरवी मिरची, कांदा टाकावा. कांदा सोनेरी रंगावर आला की त्यात किसलेली पानकोबी, गाजर, सिमला मिरची टाकावी. मिरेपुड आणि मीठ टाकावे.

  3. 3

    टाकलेल्या भाज्या चांगल्या कोरडया होईपर्यंत साधारण 5 मिनीटे परतुन घ्याव्यात. आता त्या त चिरलेली कोथिंबीर टाकून चांगले एकञ करुन घ्यावे, व थंड होऊ द्यावे.

  4. 4

    आता मोमोज बनवायला घेऊ. कणीक पुन्हा चांगली मळून घ्यावी. त्याचे लहान गोळे बनवून घ्यावे. एक गोळा घेऊन त्याची जेवढी पातळ पारी करता येईल तेवढी करावी. आता त्यामध्ये एक ते दीड चमचा सारण घालावे.

  5. 5

    त्याला आता फोटोतल्या प्रमाणे फोल्ड घालून बंद करुन घ्यावे.

  6. 6

    अशाप्रकारे मी दोनतीन आकार दिलेत. आता त्यांना वाफवून घेऊ.

  7. 7

    अशाप्रकारे व्हेज मोमोज तयार आहेत खाण्यासाठी. आता हे मोमोज गरमागरम मोमोज चटणीसोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes