वेज व्हीट, राइस फ्लोअर स्टीम मोमोज (momos recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#मोमोज #सप्टेंबर

पावसाळी वातावरणात गरमागरम मोमोज खायला मिळाले तर मानसूनचा आनंद डबल होतो. मोमोज खायला लहान मोठे सर्वाना आवडते पण रोज बाहेरचे मोमोज खाल्याने आणि मैद्याचे मोमोज खाल्याने आरोग्यावर परिणाम होतो. तेव्हा तुम्ही घरीच गव्हाच्या पीठाचे testy आणि सोबतच healthy मोमोज बनवू शकतो.

मोमो तिब्बत आणि नेपालचे एक लोकप्रिय खाद्य आहे.तिथले रहिवाशी मोठ्या आवडीने भोजनात किंवा नाश्त्यात खातात. मोमोज म्हणजे कणकेचा गोळा किंवा मैद्याच्या गोळ्याच्या आत आपली मनपसन्द खाद्यसमुग्री भरून वाफेवर केली जाते. मोमोज भारताच्या उत्तर पूर्व राज्यात , मेघालय, नागालैंड, मणिपुर राज्यात खूप लोकप्रिय आहे.

मोमोज बनवताना तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचे आवडत्या मोदकाची नक्कीच आठवण येईल. फक्त आतल सारण आपण मोदकासाठी गोड बनवितो आणि मोमोस भाज्यांचे तिखट बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम उकडीच्या मोदकासारखी असते. चला तर आज आपण व्हीट, राइस फ्लोअर स्टीम मोमोज बनवूयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 सर्व्हिंग
  1. मोमोज बनविण्यासाठी
  2. 4 टेबलस्पूनगव्हाचे पीठ
  3. २ टेबलसून तांदूळ पीठ
  4. चवीनुसार मीठ
  5. १ टीस्पून तेल
  6. आवश्यकतेनुसार पाणी
  7. भाजी- मोमोजच्या आता भरण्यासाठी-
  8. 1 टेबलस्पूनपानकोबी चिरलेली
  9. 1 टेबलस्पून गाजर,
  10. 1 टेबलस्पूनसिमला मिरची बारीक कापलेली
  11. 1 टेबलस्पूनकांदा चीरलेला
  12. 1 टेबलस्पूनबटाटा बारीक चीरलेला
  13. 10पाकळ्या लसुन बारीक टुकडे केलेले
  14. 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे केलेले
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. 1/2 टीस्पूनमिरे पावडर
  17. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  18. 1/2 टीस्पूनजिरे-पावडर
  19. 1 टीस्पूनतेल आवश्यकतेनुसार
  20. 1/2 टीस्पूनजिरे-मोहरी
  21. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    गव्हाचे पीठ आणि तांदूळ पीठ चवी पुरते मीठ व अर्धा छोटा चमचा तेल एकत्र करून पाणी घालून मळून घ्या.

    सर्व भाज्यांना कमी तेलात फोडणी द्यावी आणि त्यात मिरे पूड, चवीनुसार मीठ, चाट मसाला मिसळावा. नंतर त्यात कोथिंबीर चिरून टाकावी.

  2. 2

    पिठाचे लहान गोळे करून ते पुरीएवढे लाटून त्यात भाज्यांचे सारण घालून मोदकांप्रमाणे. किंवा कारंजी प्रमाणे आकार दयावा.

  3. 3

    सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून गरम करायला ठेवा आणि स्टिलच्या चाळणीला तेल लावून घ्या.
    15 मिनिटांसाठी वाफवायला ठेवून द्या. 15मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या आणि ५ मिनिटानंतर झाकण काढा.इडली पात्रात पण मोमोज वाफवून घेऊ शकतो

  4. 4

    गरमागरम मोमोज तयार. हे मोमोज तूम्ही लाल चटणी टोमॅटो सौस सोबत खाऊ शकता. किंवा तसेही छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes