बटाट्याचा शिरा (batata shira recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4
गोल्डन माझी सुरुवात गोड रेसिपीने करावी म्हणून हा बटाट्याचा शिरा... उपवासाचा दिवस म्हणजे खादाडखाऊ दिवस! या दिवशी जेवढे कराल तेवढे कमीच...आमच्याकडे सगळ्यांनाच आवडणारा बटाट्याचा शिरा , झटपट होणारा, बघा तुम्हालाही आवडतो का तर...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-30  मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमबटाटे
  2. 100 ग्रॅमसाखर
  3. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 300 मिली दुध सायीसकट
  5. 1/2 टीस्पूनविलायची पूड
  6. 2 टेबलस्पूनसुकामेवा तूकडे

कुकिंग सूचना

20-30  मिनीटे
  1. 1

    बटाटे उकडून घेऊन स्मॅश करुन घ्यावे.

  2. 2

    गॅस सुरु करुन गॅस वर पॅन ठेवावे. त्यात तूप टाकावे. स्मॅश केलेला बटाटा टाकावा. व बटाट्याला किंचित सोनेरी रंग येईपर्यंत परतावे.

  3. 3

    यानंतर सुकामेवा टाकावा. सायीसकट दुध टाकावे. छान मिक्स करावे. व दुध आटेपर्यंत फिरवावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात साखर व विलायची पुड टाकून एकञ करुन घ्यावे. साखर विरघळून त्याचा छान सोनेरी रंगाचा गोळा तयार होईल. हे सर्व मध्यम आचेवर करावे.

  5. 5

    बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे. आता हा शिरा वरुन सुकामेव्याचे तूकडे टाकून गरमागरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes