हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#कटलेट #सप्टेंबर
कटलेट नेहमी बटाटा वापरून करतात परंतु डायबिटिक व्यक्तीसाठी खास मुगडाळ,ओट्स,भाज्या वापरून कटलेट तयार केले .यात आले लसूण नाही तरीही अत्यंत स्वादिष्ट यम्मी लागतात. यात बी व्हिटॅमिन, प्रोटिन्स ओट्स मूळे हाय सप्लीमेंट मिळतात.अश्या रीतीने डायबेटिक कटलेट तयार केले.पाहुयात कसे करायचे .....ते..

हेल्दी डायबेटीक कटलेट (healthy cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर
कटलेट नेहमी बटाटा वापरून करतात परंतु डायबिटिक व्यक्तीसाठी खास मुगडाळ,ओट्स,भाज्या वापरून कटलेट तयार केले .यात आले लसूण नाही तरीही अत्यंत स्वादिष्ट यम्मी लागतात. यात बी व्हिटॅमिन, प्रोटिन्स ओट्स मूळे हाय सप्लीमेंट मिळतात.अश्या रीतीने डायबेटिक कटलेट तयार केले.पाहुयात कसे करायचे .....ते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅममुगाची डाळ
  2. 100 ग्रॅमओट्स
  3. 150 ग्रॅमगाजर कीस
  4. 50 ग्रॅमसिमला मिरची
  5. 50 ग्रॅमस्वीट कॉर्न
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 2 टेबलस्पूनकांदा
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनहिरवी मिरची पेस्ट
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  12. चवीपुरते मीठ
  13. 1/4 कपदूध
  14. 4-5 टेबलस्पूनतेल
  15. 5 टेबलस्पूनटोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

50 मिनिट
  1. 1

    मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेणे.डाळ बुडेल इतपत पाणी टाकुन कुकरला लावणे, एक शिट्टी मोठ्या गॅसवर करणे व गॅस सिम करून दुसरी शिट्टी करून गॅस बंद करणे.

  2. 2

    ओट्स थोडेसे भाजून घेणे म्हणजे ते चुरले जातात.गाजर किसून घेणे. सिमला मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घेणे.कॉर्न घेणे.

  3. 3

    कुकर थंड झाल्यावर डाळ काढणे. थोडेसे मळून घेणे.त्यात सिमला मिरची, गाजर,कॉर्न, कोथिंबीर कांदा,भाज्या टाकणे. हळद, तिखट,गरम मसाला, हिरवी मिरची पेस्ट चवीपुरते मीठ व भाजलेले 70 ग्रॅम ओट्स टाकून मिश्रण तयार करणे.

  4. 4

    मिश्रणाचा मिडीयम आकाराचा गोळा घेऊन त्याला गोल किंवा हार्ट शेप देणे. एका डिश मध्ये दूध घेणे व एका डिश मध्ये ओट्स घेणे. मी कटलेटना हार्ट शेप दिला.ते दुधात बुडवून घेणे व भाजून बारीक केलेल्या ओट्स मध्ये घोळवून थोडासा दाब देणे ओट्स चिकटतात.

  5. 5

    गॅसवर पॅन ठेवणे. कटलेट्स ठेवून त्याच्या भोवतीने तेल टाकून शॅलो फ्राय करणे. खमंग भाजून झाल्यावर प्लेट मध्ये काढणे. ही डिश खास डायबिटीस लोकांसाठी स्पेशल आहे.ते देखील कटलेटचा आनंद घेऊ शकतात. तर अश्या रीतीने अत्यंत चविष्ट, हेल्दी,भरपूर व्हिटॅमिनयुक्त डिश तयार केली. चला या टेस्ट करायला....सोबत टोमॅटो सॉस देणे.हिरव्या चटणी बरोबर ही सुरेख लागतात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes