बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#DDR
खुसखुशीत अतिशय टेस्टी झालेली ही बेसन बर्फी सगळ्यांनाच आवडेल

बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)

#DDR
खुसखुशीत अतिशय टेस्टी झालेली ही बेसन बर्फी सगळ्यांनाच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
१२
  1. दीड फुलपात्र बेसन
  2. 1/4फुलपात्र रवा
  3. 3/4फुलपात्र साजूक तूप
  4. 3/4फुलपात्र पिठीसाखर
  5. 2ताप वेलची पावडर
  6. 2 मोठे चमचे मिक्स ड्रायफ्रूट्स चे काप

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    प्रथम फ्राय पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम झालं की त्यामध्ये बेसन भाजायला घ्यावं बेसन थोडं भाजत आले की त्यात रवाही घालावा व सगळं मिश्रण खमंग सुगंध सुटेपर्यंत सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजावं मग त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून तीही छान परतावी त्याचबरोबर त्यामध्ये वेलची पावडर ही घालावी

  2. 2

    मंद गॅसवर मिश्रण परत जेव्हा ते पॅन सोडून एक जीव व्हायला लागतं तेव्हा एका ट्रेला किंवा एखाद्या डब्यात तूप लावून हे मिश्रण ओतावं व छान पसरवून घ्यावे

  3. 3

    मग त्याच्यावर ड्रायफूट्स पसरवावे व मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून द्यावे अर्धवट सेट झालं की त्याच्या वड्या पाडाव्यात व पूर्ण सेट होऊ द्यावे

  4. 4

    बर्फी सेट झालं पूर्ण थंड झालं की वड्या सुट्ट्या कराव्या व त्या सजवून खायला द्यावे शे रुचकर व टेस्टी अशीही बेसन बर्फी तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes