भाजणीच्या चकल्या (bhajani chakali recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#रेसिपीबुक #week15 #चकली
खमंग खुसखुशीत चकल्या सगळ्यांच्याच आवडीच्या आहेत. दिवाळीमधे केल्या जाणाऱ्या फराळामधे चकली ही जणूकाही फराळांची राणीच असते. सुंदर काटेरी मुकुट धारण केलेली चकली बघता क्षणीच आकर्षून घेते. ती बनवणे पण तेवढेच निगुतीचे काम आहे. चकलीचे पीठ मळताना ते जास्त घट्ट नसावे नाही तर चकल्या कडक होतात आणि जास्त नरम असेल तर चकल्या नरम पडतील. तसेच तळताना गरम तेलात चकली हळूच सोडावी म्हणजे तेल उडत नाही. चकलीचे बुडबुडे कमी होत असताना गॅस मध्यम करावा म्हणजे चकल्या नीट तळल्या जातीत‌. आणि आतून नरम व बाहेरुन कडक झाल्यातर नंतर चकल्या मऊ पडतात. भाजणी घरी बनवून पण चकल्या बनवू शकतो. तसेच कोणत्याही पीठापासून पण चकली बनवता येते. मी तयार भाजणीच्या पीठाच्या चकल्या बनवल्या. त्याची रेसिपी पुढे देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम तयार भाजणीचे पीठ (दोन वाट्या)
  2. 1 वाटीपाणी
  3. 2 टीस्पूनभाजलेले तीळ
  4. 1 टीस्पूनतेल (उकड काढताना पाण्यात घालावे)
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. चकलीचा साचा‌ (चकली पात्र)

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    पाणी उकळायला ठेवावे त्यात चिमूटभर मीठ, १ टीस्पून तेल आणि २ टीस्पून तिळ घालावे. आणि पाणी उकळल्यावर त्यात भाजणीचे पीठ घालून चांगले मिक्स करावे आणि १५ मिनिटे झाकून ठेवावे मग गॅस बंद करावा.

  2. 2

    भाजणीचे पीठ जरा गार झाल्यावर मळून घ्यावे. पीठ मळताना ते जास्त घट्ट नसावे आणि जास्त नरम नसावे. मळलेल्या पीठाचा लांबट गोळा करुन तो चकलीच्या साच्यामधे (चकली पात्र) घालून साचा बंद करावा.

  3. 3

    एका पाॅलिथीन पेपर वर चकल्या पाडून मग कढईमधील तेलात सोडताना तेल गरम असावे. आणि चकली एका बाजूने तळल्यावर दुसऱ्या बाजूला तळतान मध्यम आचेवर तळावे. आणि तळलेल्या चकल्या जास्तीचे तेल टिपून घेण्यासाठी टिश्यू पेपरवर काढून जास्तीचे तेल टिपून घ्यावे. चकल्या गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवाव्या. पंधरा दिवस छान रहातात.

  4. 4

    एका प्लेटमधे खमंग खुसखुशीत चकल्या ठेवून सर्व्ह कराव्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes