पारंपरिक भाजनिची चकली (bhajani chakali recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रेसिपीबुक #week15
दिवाळी आणि तिही चकली शिवाय मज्जाच नाही. यावेळी रेसिपीबुक साठी चकली थीम मिळाल्यावर ठरवल पारंपारिक भाजनिची चकली करावी प्रोसेस थोडी लांब व वेळ खाऊ आहे पण चकली अगदी कुरकुरीत व चवदार होते . या चकलीची चवच वेगळी.भाजनी तयार झाली की फटक्यात होतित चकल्या. पण भाजनी चार_पाच दिवस आधी करावी .

पारंपरिक भाजनिची चकली (bhajani chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
दिवाळी आणि तिही चकली शिवाय मज्जाच नाही. यावेळी रेसिपीबुक साठी चकली थीम मिळाल्यावर ठरवल पारंपारिक भाजनिची चकली करावी प्रोसेस थोडी लांब व वेळ खाऊ आहे पण चकली अगदी कुरकुरीत व चवदार होते . या चकलीची चवच वेगळी.भाजनी तयार झाली की फटक्यात होतित चकल्या. पण भाजनी चार_पाच दिवस आधी करावी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
  1. 200 ग्रॅमतांदुळ
  2. 100 ग्रॅमचना डाळ
  3. 50 ग्रॅमउडदाची डाळ (पाढरी साल काढलेली)
  4. 25 ग्रॅममुग डाळ
  5. 3 टेबलस्पूनधने
  6. 1 1/2 टेबलस्पूनजिरे
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 3 आणि 1/2 टीस्पूनमीठ
  9. 2-3 टीस्पूनतिखट(आवडीने कमी जास्त करा)
  10. 2 टीस्पूनहळद
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    आधी तांदूळ,चना डाळ,मुग डाळ,उडिद डाळ वेग वेगळे स्वच्छ करून ते धुवुन घ्या. आणि उन्हात वाळवून घेतले.

  2. 2

    साधारण दोन _तिन दिवस वाळवून घेतले.कढई गरम करून त्यात वेग वेगळे भाजून घेतले. रंग न बदलता मिडीयम लो फ्लेमवर वर भाजून घ्यावे.

  3. 3

    तांदुळ नंतर चना डाळ,मुग डाळ,उडिद डाळ,धने,जिरे भाजून घ्या. एकत्र करून घ्या. गिरणीतून दळून घ्या.

  4. 4

    पिठ दळून घेतले कि आता कढईत गरम पाणी करायला ठेवा एवढ्या पिठाला 400एम एल पाणी गरम करा त्यातले 50 एम एल पाणी बाजुला काढून घ्या. आता पाण्यात एक टेबलस्पून तेल घालून पाणी उकळायला ठेवा.

  5. 5

    पाणी उकळले की त्यात पिठ घाला (पिठ कढईत घालण्या आधी पिठामधे तिखट,मीठ,हळद,तिळ,ओवा घालून पिठ चांगले मिक्स करून घ्या) एकत्र करा गॅस बंद करा. पिठ परातीत (खपसरट भांड) काढा.

  6. 6

    आता बाजूला काढलेले गरम पाणी घेऊन लागेल तसे पिठामधे घालून घट्ट गोळा भिजवून घ्यावा. (पिठ गरम गरम मळावे) गॅसवर तेल लो मिडीयम फ्लेमवर गरम करायला ठेवावे.

  7. 7

    गोळा प्रत्येक वेळी सोर्यात भरताना मळून मगच भरावा म्हणजे चकली काटेदार होते. सोय्राने चकल्या पाडून घ्या. तेल जास्त गरम नको. थोडा पिठाचा गोळा टाकला असता हळूहळू बुडबुडे यायला हवे म्हणजे चकली कुरकुरीत होते.

  8. 8

    चकल्या तळून घ्या. सुरवातीला खुप बुडबुडे येतात हळूहळू ते कमी होतात. कमी झाले की कली उलटून टाकावी. एक ते दीड मिनीटे तळून काढून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes