गव्हाच्या पीठाची कोकोनट नानकटाई (coconut nankhatai recipe in marathi)

#सप्टेंबर #week 4
# नानखटाई
पहिल्यांदाच बनवली आहे.मी पीठी साखर न वापरता जाडसर साखरेचा वापर केला आहे परंतु नेहमी साखर बारीक करूनच घ्यावी.मी सजावटीसाठी सुक खोबर मिक्स फ्रुट जॅम केसर काजू बदाम आणि पिस्ते वापरले आहेत.ग्रुप मध्ये ॲड झाल्यापासून घरात माझी मुलगी आणि नवरा यांची मज्जाच आहे. वेगवेगळी पाककृती करतांना आपल्याकडून होणा-या काही चूका सुधारण्यासाठी खुप छान संधी मिळते.
गव्हाच्या पीठाची कोकोनट नानकटाई (coconut nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #week 4
# नानखटाई
पहिल्यांदाच बनवली आहे.मी पीठी साखर न वापरता जाडसर साखरेचा वापर केला आहे परंतु नेहमी साखर बारीक करूनच घ्यावी.मी सजावटीसाठी सुक खोबर मिक्स फ्रुट जॅम केसर काजू बदाम आणि पिस्ते वापरले आहेत.ग्रुप मध्ये ॲड झाल्यापासून घरात माझी मुलगी आणि नवरा यांची मज्जाच आहे. वेगवेगळी पाककृती करतांना आपल्याकडून होणा-या काही चूका सुधारण्यासाठी खुप छान संधी मिळते.
कुकिंग सूचना
- 1
तूप आणि साखर एकत्र करून हलके होईपर्यंत फेटून घ्यावे.
- 2
नंतर त्यात गव्हाचे बेसन पीठ कोकोनट आणि बेकिंग पावडर एकत्र करावे.
- 3
डोव तयार करून त्याचे छोटे गोळे करून थोडेसे दाबावे. नंतर ब्रशच्या सहाय्याने त्यावर दूध स्प्रेड करावे आणि खाली दाखविल्याप्रमाणे हवे तसे सजवावे.
- 4
बेकिंग ट्रेमध्ये बटर पेपर लावून 10 मि प्री हिट केलेल्या कढईत 15-20मि मध्यम आचेवर बेक करावे.
- 5
तयार आहे गरमागरम नानकटाई. थंड झाल्यावर डीमोल्ड करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर नानकटाई ही रेसिपी शेअर करत आहे. आजही नानकटाई मी प्रथमच करून पाहिली. यामध्ये मी साजूक तुपाचा व मैद्याचा वापर केलेला आहे.यामध्ये कोणताही कलर न घालता बदाम ,पिस्ता, व काजू, आणि मुलांच्या आवडती मिक्स फ्रुट जॅम हे सर्व पदार्थ वापरून ही नानकटाई बनवलेली आहे. ह्या पद्धतीने बनवलेली नानकटाई उपास खुसखुशीत व टेस्टी लागते.त्यामध्ये मी वेलची पावडर वापरली आहे त्याच्यामुळे त्याचा खूप छान फ्लेवर येतो. या बदल्यात व्हॅनिला इसेन्स चा वापर करू शकता. ही रेसिपी घरातील कमी सामान व कमीत कमी वेळेत बनवता येते. कुकपॅडटीम मुळे आपण कधीही न बनवलेले पदार्थ आता घरी करून बघू शकतो. त्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळत आहे. या पूर्ण सप्टेंबर महिन्यातील रेसिपी थीम मूळे माझी मुले तर खूपच खुश आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
स्टफ्ड व्हीट नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरओरिजनली नानखटाई गुजरात मधल्या सुरत मध्ये पारंपारिक पद्धतीने बनवली जातात. नानखटाईला भारतीय स्वरूपातील बिना अंड्याची बिस्किटे म्हणतात. नानखटाई बनवण्याची प्रत्येकाची स्वतःची अशी पद्धत असते, तर काहीजण मैदा , रवा आणि बेसन (चणा पीठ) यांचे मिश्रण घेऊन नानखटाई बनवतात. इथे मी गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामुळे ते पौष्टिक होतात आणि अस्सल नानखटाईची चव आणि texture मध्ये थोडीही तडजोड केली नाही. जॅम आणि खोबऱ्याचे एकत्र केलेले मिश्रण गव्हाच्या नानखटाई मध्ये भरल्यामुळे लहान मुलांना तर खूपच आवडतील. हेल्दी स्टफ्ड व्हीट नानखटाई Vandana Shelar -
फ्लेवर्ड नानकटाई (nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबर#week4 (रसमलाई, चॉकलेट, ऑरेंज, काजू आणि पिस्ता)आजची ही माझी १११ वी रेसिपी.कुकपॅड समुहात आले आणि बघता बघता १११ रेसिपींचा टप्पा कधी पार झाला ते कळले देखील नाही.अजून बराच टप्पा गाठायचा आहे आणि त्यासाठी माझ्या बरोबर कुकपॅड चा प्लेटफोम व माझ्या सुगरण मैत्रीणींची मोलाची साथ आहेच सोबतीला. फारसी शब्द नान म्हणजे रोटी व अफगाणी शब्द खटाई म्हणजे बिस्कीट ह्या दोन शब्दांवरून नानकटाई शब्द तयार झाला .भारतात नानकटाई ची सुरुवात सुरत येथे झाली. अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते जसे नानकटाई,नानखटाई, अफगाणिस्तान येथे कुल्चाये खताई वगेरे.नानकटाई साठी गव्हाचेपीठ,मैदा, बेसन,रवा,तूप व साखर हे मुख्य घटकांचा वापर करून तयार केला जाणारा पदार्थ.लहान मुलांच्या आवडीचे हे बिस्कीट अगदी तोंडात ठेवताच विरघळणारी नानकटाई घरी पण अगदी छान होते.आज मी ही फ्लेवर्ड नानकटाई तयार करण्यासाठी , कोको पावडर,केशर,ऑरेंज अक्षरशः,पिस्ता पावडर व इम्लशन चा वापर केला आहे.ज्याने नुसता चे रंगच नाही पण चव पण छान आली आहे. Nilan Raje -
खमंग खुसखुशीत नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते.मैद्याऐवजी कणिक वापरली तर नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टीक होतात.चवीला अप्रतिम आणि तोंडात विरघळून जाणारी होते.नानखटाई हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ...नानकटाई हा पदार्थ चहा सोबत मधल्या वेळात खायला छान लागते. खूप गोड नसतो. नानकटाई इडली पात्रात बनवली आहे. Prajakta Patil -
केशर,पिस्ता आणि प्लेन नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई Rupali Atre - deshpande -
रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररसमलाई तर सगळ्यांनाच आवडते. तसेच हल्ली रसमलाई केक पण खूप ट्रेंडींग आहे.आज मी त्याच रसमलाई ची चव नानकटाई मध्ये आणली. भरपूर सुका मेवा आणि केसर घालून....नुसत्या वासानेच मन तृप्त होते. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
कस्टर्ड कोकोनट नानखटाई (coconut nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरआज नवीन प्रकारे नानखटाई बनवली कस्टर्ड कोकोनट नानखटाई जमेल की नाही वाटत होते पण चविला मस्त झाली एकदम खुसखुशित. रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
हेल्दी मिक्स फ्रुट मिल्कशेक
#फ्रुट #fitwithcookpad ताजी फळे त्यात सफरचंद, ड्रॅगन फ्रूट,काळी आणि हिरवी द्राक्ष,कलिंगड, डाळिंब,तसेच ड्राय गृत्मध्ये खारीक,काजू,बदाम,,डिंक,शतावरी घेऊन दुधातून त्याचा मिल्क शेक केला.सगळ्यांना खूप आवडतो. Preeti V. Salvi -
गव्हाच्या पिठा ची नानखटाई
#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे.. Monal Bhoyar -
बदाम नानखटाई (badam nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week4नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता.बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतोपूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीतल बदाम नानखटाई बनवू या.बिना ओव्हन टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत Swati Pote -
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गव्हाच्या पिठा ची नानखटाई
#किड्स ..नानखटाई सर्वानांच माहिती आहे पण ती आपण नेहमी मैदा वापरून करतो.. आज ची रेसिपी लहान मुलांकरिता असल्यामुळे ती हेल्दी हि हवीच .. म्हणून आज आपण गव्हाच्या पिठा चा वापर करणार आहे.. चवी ला एकदम मस्त आणि तोंडात विरघळणारी आहे.. Monal Bhoyar -
बाजरी गुळाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई #week 4 बाजरीची नानखटाई मी पहिल्यांदाच करून बघितली कारण मला बाजरी फार आवडते. कुठल्या न कुठल्या तरी नेहमी वापरत असते यावेळेला त्याची आपण नानखटाई करावी असा विचार आला. गुजरात मध्ये बाजरीच्या भाकरी सोबत गुळ खातात ते ध्यानात ठेवून मी बासरी गूळ व साजूक तुपाचा उपयोग केला आहे. अतिशय पोस्टीक व सात्विक अशीही रेसिपी घरी सर्वांना खुप आवडली. Rohini Deshkar -
-
ड्रायफ्रूटस नानखटाई गव्हाच्या पिठाची (dry fruit nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमैदा हा बरेच लोक खायचे टाळतात अशा वेळी गव्हाचे पीठ वापरून बनवलेले जातात पदार्थ त्यातीलच एक म्हणजे नानखटाई. Supriya Devkar -
फ्रूटी लावा लाडू (fruity lava ladoo recipe in marathi)
#लाडूआज गोकुळाष्टमी चा दिवस . श्रीकृष्णाला लाडवाचा नैवेद्य केला पण काहीतरी त्याला थोडी ट्विस्ट द्यावी असा विचार आला. ताबडतोब कामाला लागले. प्रसाद सर्वांना खूप आवडला व त्यातील ट्विस्ट ही भारी वाटले. या लाडू मध्ये लावा सारखे जाम बाहेर येतो म्हणून त्यास लावा लाडू म्हटले आहे. Rohini Deshkar -
-
जॅम नानखटाई (jam nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरबाजारात मिळणाऱ्या नानखटाई मध्ये वनस्पती डालडा असतो. पण मी नेहमीच मुलांसाठी घरच्या शुद्ध तुपातली नानखटाई बनवते. नेहमी गव्हाच्या पिठाची बनवते पण आज मैद्याचे बनवून बघितले एकदम बाहेर मिळतात तसेच झाले आहेत.आज थोडा वेगळा प्रकार म्हणून जॅम नानखटाई बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना तर खूपच आवडले. Ashwinii Raut -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
# नानखटाई# सप्टेंबर ही रेसपी मी पहि ल्यादाच बनवत आहे किती सोपी रेसपी आहे परतुं या आधी कधीच बनविले नाही बेकरी तुन आनायचे Prabha Shambharkar -
काजू स्टफ मोदक (Kaju Stuff Modak Recipe In Marathi)
#GSRगणपती बाप्पा साठी खास होम मेड काजुचे ड्राय फ्रुट भरुन केलेले हे मोदक एकदम शाही.खायला मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#cooksnapसप्टेंबर शेफ ची नानखटाई मी सुमेधा जोशी ताई यांना cooksnap करत आहे. यात थोडी मी माझी पद्धत वापरली आहे. Sandhya Chimurkar -
-
-
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सष्टेंबर #week4नानखटाई मुलांपासुन मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची नानखटाई गोड खारी ड्रायफ्रुट टाकुनही बनवता येतात चला आज मी गोड व ड्रायफ्रुट वाली नानखटाई कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई#सप्टेंबरबेकिंग चा कुठलाही पदार्थ करायचा असेल तर मोज माप अत्यंत काटेकोरपणे घ्यावे लागते. नाहीतर तो पदार्थ बिघडतो.मी आज खूप महिन्यांनी नानखटाई केली. लॉकडाउन चालू असल्याने बरेच से जिन्नस चा तुटवडा आहे. Sampada Shrungarpure -
-
लेझी बिस्कीट स्लाईस केक (lazy biscuit slice cake recipe in marathi)
#cnaमी शीतल राऊत यांची ही जुलै महिन्यातील रेसिपी कूकस्नॅप केली आहे.मी थोडे बदाम, पिस्ता, काजू यांचे तुकडे घातले आहे.खूप छान झाला होता केक. Sujata Gengaje -
-
चॉकलेट नानखटाई (chocolate nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच केला आहे.Rutuja Tushar Ghodke
More Recipes
टिप्पण्या