मसाला कारम डोसा (masala karam dosa recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4 #week3
खूपच चवदार रेसिपी।

मसाला कारम डोसा (masala karam dosa recipe in marathi)

#GA4 #week3
खूपच चवदार रेसिपी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. डोसा मिश्रण
  2. 3 कपतांदूळ
  3. 1 कपउरड डाळ
  4. बटाट्याची भाजी
  5. 2 चमचेतेल
  6. 4उकडलेले बटाटे
  7. 2कांदे
  8. 1 चमचाउरड डाळ
  9. 2हिरवी मिरची
  10. 5-6कडीपत्ता
  11. 1/4 चमचामोहरी
  12. 1/4 चमचाहिंग
  13. चवीनुसार मीठ
  14. 1 चमचाहळदी पावडर
  15. चटणी
  16. 1/2नारळ
  17. 6-7लसूण कळ्या
  18. 4-5कडीपत्ता
  19. 100 ग्रॅमशेंगदाणे
  20. 2 चमचेफुताणा डाळ
  21. 2हिरवी मिरची
  22. 2लाल मिरची
  23. 1 चमचासाखर
  24. चवीनुसार मीठ
  25. 1 चमचाचिंच
  26. कारम पावडर
  27. 1-2लाल बेडगी मिरची,
  28. 1 चमचाधणे
  29. 1 चमचा खसखस
  30. 1 चमचामेथी दाणे
  31. चवीनुसार मीठ
  32. 1 चमचा चिंच
  33. 1 चमचालसूण चा मिश्रण

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    तांदूळ आणि उरड डाळ व्यवस्थित धुवून घ्यावी आणि त्यात मेथी दाणे टाकावे। आणि पाण्यात 4-5 तास भिजत ठेवावी।

  2. 2

    पुढे त्याला मिक्सर मधून काढून घ्यावे। आणि एखाद्या गरम अथवा दमट जागी 10-12 तास ठेवावे।

  3. 3

    बटाट्याच्या भाजी साठी कांदे, मिरची, उरड डाळ आणि कढीपत्ता काढून घ्यावे आणि चिरून घ्यावे। बटाटे उकडून घ्यावे।

  4. 4

    कढई मधे तेल गरम करून त्यात मोहरी घालावी, पुढे त्यात मिरची आणि कडीपत्ता घालावा।

  5. 5

    त्यानंतर त्यात चिरलेला कांदा टाकावा आणि मिक्स करून घ्यावे। आता त्यात हळदी आणि मीठ टाकावे। शिजल्यावर त्यात बटाटे बारीक करून टाकावे।

  6. 6

    चटणी ची सगळी सामग्री एकत्रित करून घ्यावी। मिक्सर मध्ये त्या सोबत साखर, चिंच आणि मीठ टाकावे आणि थोडे पाणि घालून मिक्सर मधून काढून घ्यावे।

  7. 7

    चटणी ला तडका देण्यासाठीकढ मधे थोडे तेल घालून मोहरी, 2 लसूण कळ्या, कढीपत्ता आणि लाल मिरची टाकावी। आणि तडका चटणी वर टाकावा।

  8. 8

    आता एक तवा थोडा मध्यम गरम असताना डोसा मिश्रण पसरवून घ्यावे। त्यावर हलके तेल टाकावे आणि थोडा कारम मसाला घालाआणि शिजू द्यावे। आता आवश्यकतेनुसार त्यावर भाजी घालावी अथवा नंतर घ्यावी।

  9. 9

    डोसा, भाजी आणि चटणी सोबत घ्यावी। कारम पावडर मार्केट मधे मिळेल।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
रोजी

Similar Recipes