पौष्टीक डोसा (dosa recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

पौष्टीक डोसा (dosa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
1सर्विनग
  1. 50 ग्रॅमहिरवा मुग
  2. 1 टीस्पूनउडीद डाळ
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 1 इंचआलं
  5. 3-4पाकळ्या लसूण
  6. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 5-6पान कढीपत्ता
  8. भाजी
  9. 1मध्यम आकाराचा बटाटा
  10. 1 लहानआकाराचा कांदा
  11. 3-4पाकळ्या लसूण
  12. 1 इंचआलं
  13. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. 1/2 टेबलस्पूनफोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    हिरवा मुग व उडीद डाळ वेगवेगळे चार-पाच तास भिजवा.त्यानंतर हिरवा मूग व उडीद डाळ एकत्र करा. त्यात हिरवी मिरची,कढीपत्ता, कोथिंबीर, आलं-लसूण,मीठ टाकून, मिक्सर वर बारीक फिरवून घ्या.

    दोसे टाकता येतील याप्रमाणे बॅटर तयार करा.गॅसवर पॅन ठेऊन मध्यंम आकाराचे डोसे टाका. कडेने थोडेसे तेल सोडा. एक बाजू झाली की दोसा पालटून टाका.दोन्हीं बाजू खरपूस झाल्या कीं दोसा तयार झाला असे समजायचे. हा हिरवा मुग पौष्टिक असतो,त्याच्या सोबत उडीद डाळ बलवर्धक बटाट्याची भाजी, सॉस, शेंगदाण्याची चटणी, किंवा लोण्याबरोबर खाऊ शकतो.

  2. 2

    बटाटा उकडून घ्या. त्याच्या फोडी करून घ्या. हिरवी मिरची,कढीलिंब,कोथिंबीर,आलं,लसूण मिक्‍सरवर फिरवून त्याची पेस्ट करा.

    पॅनमध्ये फोडणीस अर्धा टेबलस्पून तेल ठेवा. तापलेल्या तेलात, बारीक चिरलेला कांदा परतून, त्यात वाटलेला हिरवा मसाला टाका. चावी प्रमाणे मीठ टाका,1/4टीस्पून हळद टाकून, बटाट्याच्या फोडी टाकून,झणझणीत भाजी तयार करा, व पौष्टिक दोस्या बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes