हिरव्या मुगाचे डोसे (hirvya moongache dosa recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#kdr
कडधान्य ही आपल्या आहाराला परिपूर्ण बनवतात.कारण यात भरपूर प्रथिनांचा स्त्रोत असतो.प्रथिनांनी स्नायुंना बळकटी व उर्जाही मिळते.मोड आणलेल्या कडधान्यात सर्वात जास्त प्रथिने तसेच कार्ब्ज आपल्याला मिळतात.म्हणूनच हिवाळा आणि पावसाळा या ऋतुमध्ये बलदायी अशी कडधान्यांची कडबोळी,भाजणीचे थालिपीठ इ.प्रकार आपल्याकडे करण्याची प्रथा आहे.वेटलॉस करण्यातही स्प्राऊट्स महत्त्वाचेच!पोट लवकर भरल्याची भावना होते.तसेच पचनासही जड असल्याने भूक लवकर लागत नाही.कडधान्यांचे मोड आणून केलेले कढणही अतिशय पौष्टिक असते.लहान बाळांनाही हे आवर्जून दिले जाते.
आबालवृद्धांना,आजाऱ्यांना फारच पथ्यकारक असे "हिरवे मूग" हे त्यामानाने पचायला हलके.याची उसळ किंवा मुगाचं बिरडं नारळ चव,कोकम घालून मस्त लागते.बारीक चिरलेला कोबी व मोडाचे हिरवेमूग यांचे लिंबू पिळलेली कोशिंबीरही ताटाची शोभा तर वाढवतेच पण पौष्टिक ही तितकीच!सालीसकट मुगाच्या डाळीची खिचडी तर फारच लोकप्रिय.धिरडी,डोसे हे सकाळचे किंवा मधल्यावेळचे खाणे म्हणून पोटभरीचे होते.ज्यांना हरभऱ्याच्या डाळीच्या पीठाचा त्रास/संधीवात वगैरे असतो,त्या सगळ्यांसाठी हिरवे,पिवळे मूग,मूगडाळ हे वरदानच!
आजचे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसेही असेच स्वादिष्ट😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोहिरवे मूग
  2. 1 कपतांदूळ पीठ
  3. 1 टेबलस्पूनमिरची ठेचा
  4. 1 टीस्पूनआल्याचा ठेचा
  5. 1/4 कपकोथिंबीर
  6. 1/4 टीस्पूनमेथ्या /मेथ्यांची पूड
  7. 1 छोटाकांदा
  8. जरुरीनुसार पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    हिरवे मूग सात ते आठ तास भिजवावेत.(मोड आणायचे असल्यास उपसून,बांधून उबदार जागी ठेवावेत.)मूग लवकर भिजतात.चाळणीत निथळून हिरवे मूग अगदी बारीक वाटावेत.वाटतानाच त्यात तांदूळ पिठी,कांदा चिरून,मेथ्या,आलंमिरची ठेचा घालावा.
    (टीप:मूग भिजवतानाच 1/2वाटी तांदूळ व मेथ्याही घातल्यास चालतात)

  2. 2

    मिश्रण वाटल्यावर घट्ट होते.हे पीठ फार पातळ नाही व फार घट्ट नाही होणार इतपतच पाणी घालावे.डोसा तव्यावर पसरता आला पाहिजे असे पीठ असावे.यात चवीनुसार मीठ घालावे.गँसवर डोशाचा तवा तापत ठेवावा.पूर्ण तापू द्यावा.गँस बारीक करावा.आता तयार पीठ हलवून डावाने तव्यावर घालावे व सगळीकडे पसरावे.मोठा गँस असेल तर पीठ पसरले जात नाही.डोसा घालून झाल्यावर मिडीयम आचेवर झाकण घालून डोसा होऊ द्यावा.

  3. 3

    तव्यावरचे झाकण काढून डोसा उलटावा.दुसरी बाजू थोडी भाजून घ्यावी.थोडासा कुरकुरीत हवा असल्यास थोडा जास्त तव्यावर ठेवावा.डोसा तयार आहे.पटकन सुटून येतो.तांदूळ/तांदूळ पीठी घातल्याने डोशाला एक प्रकारचे बाईंडींग येते.एरवी नुसते हिरवे मूग वाटून डोशाचे/धिरड्याचे पीठ विसविशीत होते.

  4. 4

    आलं,मिरची,कांदा,कोथिंबीर यांचा खूप छान स्वाद या डोशाला येतो.त्यामुळे नुसते तुपाबरोबर ही खाऊ शकता किंवा कोरडी चटणी,सॉसही चांगला लागतो.
    फक्त गरमगरमच हा डोसा चविष्ट लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes